सांगोला शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पूर्णाकृती पुतळ्याचे उद्या आगमन बहुजन बंधू भगिनींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
भारतीय जनता पार्टी सांगोला शहराध्यक्ष विशाल बनसोडे
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला प्रतिनिधी - शुक्रवार 14 फेब्रुवारी 2025 रोजी महामाता भिमाई रामजी आंबेडकर यांच्या 171 व्या जयंती दिनानिमित्त विश्वरत्न विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे
सांगोला शहरात मुंबईहून आगमन होणार असल्याची माहिती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने देण्यात आली.
बहुजन बंधू भगिनींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी विश्वशांतीदूत महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य आगमन सोहळा होणार आहे
तरी तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांनी व आंबेडकरी प्रेमींनी उद्याच्या होणाऱ्या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी सांगोला शहराध्यक्ष विशाल बनसोडे यांनी केले आहे




0 Comments