google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यासाठी टेंभू योजनेचे पाणी मिळणार शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद पाटील

Breaking News

सांगोला तालुक्यासाठी टेंभू योजनेचे पाणी मिळणार शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद पाटील

 सांगोला तालुक्यासाठी टेंभू योजनेचे पाणी  मिळणार शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद पाटील


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला, ता. 23 फेब्रुवारी – सांगोला तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीसाठीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता, टेंभू योजनेचे पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे,

 अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद पाटील यांनी केली यांविषयी अरविंद पाटील यांनी माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भैया मोहिते-पाटील यांच्याकडे वस्तुस्थितीची माहीती दिली..

या मागणीची तातडीने दखल घेत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी विभागाचे  अधिकारी रेडीय्यार यांना 9 फेब्रुवारी रोजी फोन करून "25 फेब्रुवारीपर्यंत सांगोला तालुक्याला पाणी मिळालेच पाहिजे," असे निर्देश त्यांनी दिले

 असून, प्रशासनानेही त्यास सहमती दर्शवली आहे.  टेंभू योजनेचे पाणी सांगोल्यासाठी देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे.

Post a Comment

0 Comments