google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..बंधाऱ्यात मासे पकडायला गेलेल्या व्यक्तीचा गाळात रुतून वृद्धाचा मृत्यू सांगोला तालुक्यातील मेथवडे येथील घटना

Breaking News

खळबळजनक..बंधाऱ्यात मासे पकडायला गेलेल्या व्यक्तीचा गाळात रुतून वृद्धाचा मृत्यू सांगोला तालुक्यातील मेथवडे येथील घटना

खळबळजनक..बंधाऱ्यात मासे पकडायला गेलेल्या व्यक्तीचा गाळात रुतून


वृद्धाचा मृत्यू सांगोला तालुक्यातील मेथवडे येथील घटना

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

तालुका प्रतिनिधी सांगोला बंधाऱ्यातील पाण्यात मासे पकडताना डबक्यातील पाण्याच्या चिखलाचा अंदाज न आल्याने खोलवर गाळात रुतून अडकल्याने वृद्धाचा गुदमुरुन मृत्यू झाला. 

ही घटना रविवार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मेथवडे (ता. सांगोला) येथील देवळे रोडवरील माण नदीच्या बंधाऱ्यात घडली. भाऊसाहेब दामोदर जाधव (वय-६०, मेथवडे ता. सांगोला) असे वृद्धाचे नाव आहे आहे.

मृत भाऊसाहेब जाधव व त्यांचा जोडीदार योगेश चौधरी असे दोघेजण मिळून रविवार रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मेथवडे-देवळे रोडवरील माण नदीवर असलेल्या बंधाऱ्यातील पाण्यात मासे पकडण्यासाठी गेले होते.

 यावेळी योगेश चौधरी हे नदी काठावर बाहेर थांबले होते. तर भाऊसाहेब जाधव मासे पकडण्यासाठी बंधाऱ्यातील पाण्याच्या डबक्यात उतरले असता त्यांना पाणी व गाळातील चिखलाचा अंदाज न आल्यामुळे ते अडकून रुतले गेले. 

हा प्रकार योगेश चौधरी याने पाहून गावात येऊन चुलत भाऊ मनोज चौधरी यांना सांगितला ब कल्याण जाधव यांनी नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी बंधाऱ्यावर धाव घेऊन बंधाऱ्याच्या पाण्यात भाऊसाहेब यांचा शोध सुरू केला

 असता तब्बल दोन तासांनी दुपारी १२ वाजता गावातील अभिमान सोनवने यांनी भाऊसाहेब जाधव यांना गाळातून बाहेर काढले. दरम्यान पुतण्या गणेश जाधव यांनी भाऊसाहेब जाधव यांना

 सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. - याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय -अधिकारी डॉ. आवताडे यांनी खबर दिली.

Post a Comment

0 Comments