धक्कादायक..सांगोला तालुक्यातील कमलापूर येथील घटना: पिकअपचे चाक अंगावरून
गेल्याने चिमुकल्याचा मृत्यू खेळण्याची वस्तू आणण्यासाठी गेल्यावर झाला अपघात
तालुका प्रतिनिधी( शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला पिकअपचे चाक चिमुकल्याच्या अंगावरून गेल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास कमलापूर (ता. सांगोला) येथे घडली. वेदांत विलास काळे (वय दोन) असे मृत झालेल्या बालकाचे नाव आहे.
कमलापूर (ता. सांगोला) येथील पिकअप चालकाने त्याचे वाहन रस्त्यावर काळे यांच्या घराशेजारी उभे केले होते. दरम्यान पिकअप गाडीच्या आजूबाजूला लहान मुले खेळत होती.
लहान मुले खेळताना पिकअप चालकाने लहान मुलांना बाजूला काढले व पिकअप वाहनांमध्ये जाऊन गाडी सुरू केली. गाडीमधील टेप रेकॉर्ड मोठ्या आवाजात चालू केला. त्यावेळी वेदांत काळे हा बालक मृत वेदांत काळे
पिकअप गाडीखालीच काहीतरी खेळण्याची वस्तू आणायला गेला होता. चालकाने गाडी सुरू केल्यानंतर तो गाडी पुढे घेत असताना आजूबाजूच्या लोकांनी गाडीखाली लहान मुलगा आहे,
असे ओरडून सांगितले. परंतु गाडीमधील टेपरेकॉर्डच्या आवाजामुळे चालकाला लोक काय बोलतात ते समजले नाही.
यावेळी गाडीखाली असलेल्या वेदांत काळे याच्या डोकीवरून पिकअपचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यास उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तो उपचारापूर्वीच मरण पावल्याचे सांगितले.
याचाचत ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. आवताडे यांनी पोलिसात खबर दिली आहे.
चौकट
टेप रेकार्डच्या आवाजाने झाला घात
चालकाने वाहनाच्या बाजूला असलेल्या खेळणाऱ्या मुलांना बाजूस करुन पिकअप वाहन चालू केला. त्यानंतर टेप रेकार्ड चालू करुन त्याचा आवाज मोठा ठेवला होता. त्याचवेळी वेदितात काळे याने खेळायची वस्तू आणण्यासाठी पिकअपखाली गेला.
चिमुकला पिकअपखाली गेल्याचे पाहून नागरिकांनी चालकाला आरडाओरड करून पिकअप थांबवण्याचा प्रयत्न केले. परंतु टेप रेकॉर्डच्या आवाजाने चालकाला ऐकू न आल्याने बाहन सुरु झाल्याने यात त्याचा घात झाला.
0 Comments