मोठी बातमी..सांगोला तहसिल कार्यालयातील पुरवठा
विभागातील अधिकारी व कर्मचार्यांकडून नागरीकांना दिली जाते दुय्यम वागणुक...
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला प्रतिनिधी ः सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जिवनावश्यक असलेल्या गरजांपैकी शिधापत्रिका ही एक अत्यंत गरजावश्यक गोष्ट बनलेली आहे. कोणाला शिधा मिळण्यासाठी, कोणाला शासनाने लागू केलेल्या
आरोग्य उपचार मोफत मिळविण्यासाठी, कोणाला आपण येथील रहिवाशी आहोत हे सिध्द करण्यासाठी व इतर कारणासाठी शिधापत्रिका ही अत्यंत महत्वाची बाब बनलेली असताना सांगोला शहर व तालुक्यातील अनेक नागरीक
आपले शिधापत्रिकेसंबंधी अडचणी सोडविण्यासाठी सांगोला तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागाकडे येत असतात काही शिक्षित असले तरी जास्तीत जास्त नागरीक हे आसपासच्या खेड्यापाड्यातील अशिक्षित देखील येत असतात
मात्र या कार्यालयाकडे आल्यावर येथील अधिकारी व कर्मचारी या नागरीकांच्या अडचणीची थट्टा करीत त्यांना योग्य ती माहिती देण्याऐवजी त्या तुच्छतेची वागणुक देवून अरेरावी,
उडवाउडवीची उत्तरे देणे तर नागरीकांना या ऑनलाईन रेशनकार्डची जास्त माहिती नसल्यामुळे दिशाभूल करणारी उत्तरी दिली जात आहेत. तुमचे काम झाले आहे, प्रोसेस मध्ये आहे असे विविध काहीही उत्तरे देवून येथे येणारे नागरीकांना तेथून ते पाठवून देतात.
नागरीक हे उत्तरे ऐकून आपल्या मनाचे समाधान करीत येथून निघून जातात मात्र काही दिवसांनी परत आपले काम नाही झाले म्हणून आपल्या दिवसाचे कामधंदा सोडून रोजगारी बुडवून या कार्यालयाकडे हेलपाटे मारीत असतात परंतु या नागरीकांचे काम काही होताना दिसत नाही.
शासनाने हा विभाग नागरीकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व त्यांचे काम सोईस्कररित्या होण्याकरीता हे रेशनकार्ड ऑनलाईन प्रणालीची सेवा जरी सुरू केली असली तरी हे अधिकारी मात्र त्याची अंमबजावणी प्रामाणिकपणे करीत असल्याचे दिसून येत नाही.
उलट आपल्याकडे आपले कामधंदे सोडून येणार्या लोकांना येथील अधिकारी व कर्मचारी दुय्यम वागणुक देवून चुकीची माहिती देवून नागरीकांची दिशाभूल करीत असल्याचे सध्या या कार्यालयात दिसून येत आहे.
सांगोला तहसिलदार यांनी नागरीकांना होणार्या त्रासापासून मुक्त करून त्यांची कामे योग्य ती व योग्य वेळेवर करण्यासाठी संबंधीतांना योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी सांगोला तालुक्यातून त्रस्त नागरीकांतून मोठ्या प्रमाणात होत आहे.
0 Comments