google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..श्री.अंबिकादेवी यात्रेमध्ये 1 हजार 659 जनावरांच्या खरेदी-विक्रीतून सुमारे 2 कोटी 25 लाख रु.ची उलाढाल कृषी उत्पन्न बाजार समितीस मिळाले 2 लाख 10 हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न : सभापती समाधान पाटील

Breaking News

मोठी बातमी..श्री.अंबिकादेवी यात्रेमध्ये 1 हजार 659 जनावरांच्या खरेदी-विक्रीतून सुमारे 2 कोटी 25 लाख रु.ची उलाढाल कृषी उत्पन्न बाजार समितीस मिळाले 2 लाख 10 हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न : सभापती समाधान पाटील

मोठी बातमी..श्री.अंबिकादेवी यात्रेमध्ये 1 हजार 659 जनावरांच्या खरेदी-विक्रीतून सुमारे 2 कोटी 25 लाख रु.ची


उलाढाल कृषी उत्पन्न बाजार समितीस मिळाले 2 लाख 10 हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न : सभापती समाधान पाटील 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला  : सांगोला येथील ग्रामदैवत श्री.अंबिकादेवी यात्रेमध्ये 1 हजार 659 जनावरांच्या खरेदी-विक्रीतून सुमारे 2 कोटी 25 लाख रु.ची उलाढाल झाली आहे.  

यात्रेतील शेतकरी, व्यापार्‍यांना बाजार समितीच्या वतीने पाणी, वीजेची सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. 

यामधून कृषी उत्पन्न बाजार समितीस 2 लाख 10 हजार रुपये  आर्थिक उत्पन्न मिळाल्याची माहिती  कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान पाटील यांनी दिली आहे. 

सांगोला येथील ग्रामदैवत श्री.अंबिकादेवीची यात्रा कोर्ट रिसिव्हर्स व प्रदर्शन समितीच्या वतीने 30 जानेवारी ते 07 फेब्रुवारी  या कालावधीत भरविण्यात आली होती. 

सांगोल्यातील श्री.अंबिकादेवी यात्रा खिलार जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी सुप्रसिद्ध असल्याने, 

जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी बेळगाव, जळगाव, पुणे, गुलबर्गा, बीड, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर अर्थात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातून व्यापारी शेतकरी दाखल झाले होते.

 यात्रेत खिलार बैल, वळू, खोंड, जर्शी गाई, म्हैस, पंढरपूर म्हशीसह शेळ्या-मेंढ्याची मोठ्याप्रमाणात होणार्‍या खरेदी-विक्रीसाठी व्यापारी, शेतकरी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

 शेतकरी व्यापारी यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कोर्ट रिसिव्हर्स यांच्या सहकार्याने जागा वाटपाचे नियोजन करून लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यासह जनावरांसाठी पाणी देखील उपलब्ध करून दिले होते. 

यात्रा कालावधीत सुमारे  4 हजार 335 जनावरांची आवक झाली होती. त्यामध्ये 362 जर्शी गाय, 9 खिलार गाय, 635 बैल व खोंड, 241 पंढरपूर म्हैस, 412 शेळ्या व मेंढ्या, असे 

सुमारे 1 हजार 659 जनावरांच्या खरेदी-विक्रीतून सुमारे 2 कोटी 10 लाख ते 2 कोटी 25  लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.

 यामधून कृषी उत्पन्न बाजार समिती 2 लाख 10 हजार रुपये चा आर्थिक नफा झाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान पाटील यांनी सांगितले आहे. 

चौकट :

सांगोल्याचे ग्रामदैवत श्री अंबिकादेवी यात्रेमध्ये 362 जर्सी गायची विक्री झाली. यामध्ये कमीत कमी 25 हजार रुपये पासून ते जास्तीत जास्त 95 हजार 500 रुपये तर सरासरी 60 हजार रुपयांप्रमाणे दर मिळाला.  

9 खीलार गायची विक्री झाली. यामध्ये कमीत कमी 14 हजार रुपये पासून ते जास्तीत जास्त 35 हजार रुपये तर सरासरी 21 हजार रुपयांप्रमाणे दर मिळाला.

  241 पंढरपुरी म्हैस ची विक्री झाली. यामध्ये कमीत कमी 24 हजार रुपये पासून ते जास्तीत जास्त 80 हजार 200 रुपये तर सरासरी 50 हजार रुपयांप्रमाणे दर मिळाला. 635 बैलाची विक्री झाली.  यामध्ये कमीत कमी 17 हजार रुपये पासून ते जास्तीत जास्त 65 हजार रुपये

 तर सरासरी 36 हजार रुपयांप्रमाणे दर मिळाला. 412 शेळ्या ची विक्री झाली. यामध्ये कमीत कमी 7 हजार 500 रुपये पासून ते जास्तीत जास्त 20 हजार 500 रुपये तर सरासरी 12 हजार रुपयांप्रमाणे दर मिळाला.

Post a Comment

0 Comments