ब्रेकिंग न्यूज..एकनाथ शिंदे यांचा पुतळा उभारणार, सांगली जिल्हाप्रमुखाची घोषणा
आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने सांगली जिल्हा शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुखाने सांगलीमध्ये एकनाथ शिंदे यांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे.
शिंदे यांच्या हयातीतच हा पुतळा उभारण्याचा निर्धार देखील करण्यात आला आहे. या घोषणेची चर्चा संपूर्ण राजकिय वर्तुळामध्ये होत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सांगली जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी सांगलीत शिंदे यांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. आपल्या नेत्यांचे पुतळे हे त्यांच्या निधनानंतर उभारले जातात.
पण ते हयातीत असतानाच पुतळे उभारले पाहिजे. म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्या हयातीतच हा पुतळा उभारला जाणार आहे असे महेंद्र चंडाळे यांनी म्हटले आहे.
या वाढदिवसाला घोषण झाली, आता पुढच्या वाढदिवसाच्या आत सांगलीमध्ये पुतळा उभारला जाईल असा विश्वास देखील जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाकडून राज्यभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बच्चू कडू ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
राजकीय संबंधांमुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा आहे आणि ही इच्छा मी त्यांच्यासमोर व्यक्त केली आहे. असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.
0 Comments