google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यासह 'या' गावात येणार पाणलोट यात्रा; गावोगावी चळवळ राबविण्यासाठी प्रयत्न सुरू : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती

Breaking News

सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यासह 'या' गावात येणार पाणलोट यात्रा; गावोगावी चळवळ राबविण्यासाठी प्रयत्न सुरू : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती

सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यासह 'या' गावात येणार पाणलोट यात्रा;


गावोगावी चळवळ राबविण्यासाठी प्रयत्न सुरू : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती

सोलापूर :- प्रत्येक गावात सामूहिक श्रमदानातून पाणलोट चळवळ निर्माण व्हावी या उद्देशातून केंद्र सरकारने राज्यातील ३० जिल्ह्यात पाणलोट यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कुडूवाडी, माढा, मंगळवेढा तसेच सांगोला या चार तालुक्यात लवकरच पाणलोट यात्रा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

या यात्रेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली

यावेळी सदस्य सचिव तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमोल जाधव, जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद एस. एस. पारशे,

उपविभागीय अधिकारी भीमा पाटबंधारे विभाग एस. डी. हलकुडे, प्रकल्प संचालक नेहरू युवा केंद्र अनिल हिंगे, उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन

 प्राधिकरण वाय.चौधरी, उपकार्यकारी अधिकारी सोलापूर पाटबंधारे विभाग ओ. बी. थंबद, प्रांत अधिकारी माढा पी.व्ही. आंबेकर आदी उपस्थित होते

पाणलोट कामांवर श्रमदान अपेक्षित

सर्व यंत्रणांना एकत्र येऊन गावोगावी पाणलोट चळवळ निर्माण व्हावी, या अनुषंगाने नवीन मृद व जलसंधारण कामांचे भूमिपूजन करणे, पाणलोट कामांवर श्रमदान करणे, पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करणे,

पाणलोट योद्धे निवडणे इत्यादी कामांचे सूक्ष्म नियोजन करून या उपक्रमांतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, बचत गटातील महिला, स्वयंसेवी संस्था व

 शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments