सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना..पतीच्या तिसऱ्या दिवसाच्या विधी दिवशी पत्नीने संपवली
जीवन यात्रा घोंगडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला ; सांगोला तालुक्यातून हळहळ व्यक्त
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :- पतीच्या मृत्यूचा विराह सहन न झाल्याने, पत्नीने पत्रा शेडमध्ये लोखंडी अँगल ला गळफास घेऊन आत्महत्या केली ही दुर्दैवी घटना गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाढेगाव तालुका सांगोला येथे घडली.
अनिता निखिल घोंगडे वय 23 असे गळफास घेऊन मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी पोलिसात खबर दिली आहे.
वाढेगाव येथील निखिल घोंगडे याचा 5 डिसेंबर रोजी अनिता हिच्या समवेत विवाह झाला होता. विवाह नंतर निखिल ने आपल्या लग्नपित्यार्थ
नातेवाईकांना 8 डिसेंबर रोजी रिसेप्शन पार्टी दिली होती. त्यानंतर घरात मंगल कार्य झाल्यामुळे घोंगडे कुटुंबीयात आनंदाचे वातावरण होते.
दरम्यान 7 जानेवारी 2025 रोजी निखिल घोंगडे यांचा अल्पशा आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे पत्नी अनिता निशब्द झाली होती. पतीच्या तिसऱ्या दिवसाचा विधी काल गुरुवारी सकाळी साडेसात वाजता होता
तत्पूर्वी पत्नी अनिता यांनी पतीचा विराह सहन न झाल्याने राहत्या घराच्या पाठीमागील पत्रा शेडमध्ये ओढणीने लोखंडी अँगल ला गळफास घेतला.
पहाटेच्या वेळी नातेवाईकांना अनिता घरात दिसून न आल्यामुळे शोधाशोध करीत असताना, अनिता यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. अनिता यांना खाली उतरवून तातडीने उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता
डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अवघ्या एक महिन्यातच आनंदित असणाऱ्या घोंगडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे अख्ख गाव हळहळ व्यक्त करीत आहे.
0 Comments