google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 'शब्दांकुर' पुरस्काराने कवी सुनिल बिराजदार सन्मानित !

Breaking News

'शब्दांकुर' पुरस्काराने कवी सुनिल बिराजदार सन्मानित !

'शब्दांकुर' पुरस्काराने कवी सुनिल बिराजदार सन्मानित !


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला प्रतिनिधी/समाधान मोरे मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर नगरीचे न्यायदेवता कै. रामगोंडा बापुराया चौगुले यांच्या २४ व्या पुण्यतिथी निमित्त सालाबादा प्रमाणे कै.रामगोंडा बापुराया चौगुले बहुउद्देशीय संस्था

 तसेच आर.बी.सी. इंग्लिश मीडियम स्कूल, ज्युनिअर कॉलेज तांडोर यांच्या संकल्पनेतून "सिद्धापूर फेस्टिवलचे' आयोजन करण्यात आले होेते.

समाजातील विविध  कलागुण साहित्य,क्रिडा ,कृषी ,शिक्षण,पत्रकार आदि क्षेत्रातील योगदानाबद्दल गुणीजणांच्या कार्याचा गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. 

 यावेळी यंदाचा साहित्यिक क्षेत्रातील 'शब्दांकुर पुरस्कार' युवा कवी सुनिल बिराजदार ,पुणे यांना प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार सोहळा  मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघचे लोकप्रिय आमदार समाधान आवताडे यांचे पत्नी आवताडे मँडम व तसेच

 आर.बी.सी.इंग्लिश मेडियम स्कुल व ज्युनिअर काँलेज चे संस्थापक प्रा.गजानन पाटील, डाँ.विभीषण रणदिवे गट शिक्षण 

अधिकारी ,मंगळवेढा प्रदिप खांडेकर मा.सभापती,मंगळवेढा यांच्या उपस्थित पार पडला. यावेेळी कवी सुनिल बिराजदार यांनी त्याचे आई, वडिल परिवारातील सदस्यासह सर्वांनी उपस्थित राहून हा सन्मान स्विकारला .

आकाशवाणी फेम कवी सुनिल बिराजदार यांच्या कविता आकाशवाणी सोलापूरहून प्रसारित झाल्या आहेत. ते क्राईम न्युज इंडियाचे मिडिया पत्रकार म्हणूनही काम पाहतात,

 त्यांची 'हरविलेला बाप' ही त्याच्याच लेखनीतून साकार झालेली कविता त्याच्याच आवाजात सर्वत्र प्रसिद्ध आहे. 

त्यांनी अनेक कवीसंमेलनात सहभागी होत, कवितावाचन, सुत्रसंचालन ही केलेले आहे, नुकताच काढलेला त्याचा 'सुनिल बिराजदार व्हाँल्ग' 

 (SUNIL BIRAJDAR VLOG )युट्युब चँनेल लोकप्रियता मिळवत आहे.

Post a Comment

0 Comments