शहरात सार्वजनिक टॉयलेट सुविधा बसवण्याचे काम सुरू :-
अशोक कामटे संघटना अशोक कामटे संघटनेच्या पाठपुराव्याला यश
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे 9503487812)
सांगोला (प्रतिनिधी) महात्मा फुले चौक ते जुने एसबीआय बँकेपर्यंत सार्वजनिक मुतारी व शौचालयाची सुविधा नगरपालिकेने करावी,
याबाबत नगरपालिकेकडे यापूर्वी अनेकदा अशोक कामटे संघटनेने मागणी केलेली होती.
याबाबतचे निवेदन स्मरणपत्र सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांना शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आले होते.
यापूर्वी देखील स्टेशन रोड , सर्व शहर परिसरात अशा प्रकारची सार्वजनिक टॉयलेट उभा राहवीत मागणीद्वारे केली होती, लघुशंकेचा प्रश्न निर्माण झाला होता.
नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी डॉ .सुधीर गवळी यांनी कामटे संघटनेच्या निवेदनाची दखल घेऊन पूर्तता केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
तालुक्यातून व इतर भागातून अनेक नागरिक सांगोल्यात कामाकरिता सातत्याने दैनंदिन येत असतात त्यामध्ये महिला वर्गांचा मोठी संख्या आहे त्याचबरोबर पुरुषही तेवढ्याच
प्रमाणात आवक-जावक करतात शहरामध्ये तीन ते चारच पुरुषांकरिता सुस्थितीत सार्वजनिक मुतारींची सोय होती त्यामुळे नागरिकांना खुल्या जागेचा आसरा घ्यावा लागत आहे
महिला वर्ग लाजून हा प्रश्न कुठेही बोलत, वाच्यता करत नसल्याने लघुशंकेची समस्या निर्माण झालेली होती तरी नगरपालिकेने तात्काळ स्टेशन रोड परिसरात , सांगोला शहरात 10 महत्वाच्या व आवशक
ठिकाणी महिला व पुरुषांकरिता स्वच्छतागृह उभारण्याचे, बसवण्याचे काम सुरू केले आहे . याकरिता अशोक कामटे संघटनेने अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने नगरपालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे.
चौकट:-
शहीद अशोक कामटे संघटनेने सर्वत्र शहरांमध्ये मागणी केल्याप्रमाणे आवश्यक 10 ठिकाणी स्त्री व पुरुषांकरिता स्वतंत्र टॉयलेट बसवण्याचे काम सुरू आहे.
अशोक कामटे संघटनेचा या प्रश्र्नी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युजच्या बातमीची दखल घेतली धन्यवाद )
डॉ. सुधीर गवळी. मुख्याधिकारी सांगोले नगरपरिषद, सांगोले
0 Comments