google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी ..वाढेगाव,सांगोला मधील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक वैभव ऐवळे आणि टीम ने कठीण श्रेणीत गणला जाणारा मलंगगड सर केला

Breaking News

मोठी बातमी ..वाढेगाव,सांगोला मधील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक वैभव ऐवळे आणि टीम ने कठीण श्रेणीत गणला जाणारा मलंगगड सर केला

मोठी बातमी ..वाढेगाव,सांगोला मधील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक वैभव ऐवळे आणि टीम ने कठीण श्रेणीत गणला जाणारा मलंगगड सर केला 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

वाढेगाव, सांगोला जि. सोलापूर मधील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक वैभव ऐवळे, अमित चव्हाण, सूरज सुतार, 

अक्षय सिंग आणि निलेश माने यांच्या टीम ने २५ जानेवारी रोजी कल्याण मधील कठीण श्रेणीतील श्रीमलंगगड सर केला.

३२०० फूट उंचीचा टेहळणी कडा आहे. चढाईसाठी अवघड असलेला श्रीमलंगगड चढण्यासाठी गिर्यारोहणाचा अनुभव आणि आरोहणाची उपकरणे असणे गरजेचे आहे.

माथेरान डोंगर रांगेतील टेहळणी कडा म्हणजे कल्याणचा श्री मलंगगड. शिलाहार राजाने बांधलेला हा गड आजूबाजूच्या परिसरावर लक्ष देण्यासाठी गेला होता.

 कल्याणच्या दक्षिणेस अवघ्या १६ कीमी अंतरावर हा गड आहे. पनवेल- वावंजे गावापासून २ किमी. बदलापूरच्या नैऋत्येस व मुंबईच्या पूर्वेस हा किल्ला आहे.

करंजा, उरणच्या नैऋत्येस आणि बोरघाट, भीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा किल्ला होता.

श्री मलंगगडाचां माथा गाठण्यासाठी सुमारे २.३० ते ३.०० तास लागतात. गडमाथा गाठण्यासाठी उंचीवर असलेल्या अगदी एकच पायाला ठेवता येईल अश्या पाईप वरून जाण्याची वाट आहे.

 ह्या वाटेवरून चालताना आपल्या मानसिकतेचा कास लागतो, अनेक वर्षांचा सराव, आरोहणाचे ज्ञान, शारीरिक व मानसिकतेचा कस पाहणारा हा किल्ला आहे.

मुंबईतील समन्वय संस्थेच्या अनुभवी गिर्यारोहकानी मिळून हा किल्ला २५ जानेवारी रोजी सर केला. अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता ७५ तिरंग्याचं तोरण फडकवुन करण्यात आली.

टीममध्ये वैभव ऐवळे, अमित चव्हाण, निलेश माने, सूरज सुतार आणि व्हिडिओ शूटिंग करणारे अक्षय सिंग होते.

गतवर्षी २६ जानेवारी अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वैभव यांच्या मार्गदर्शनाखाली टीम ने उत्तराखंड 

मधील केदारकंठा या १२५०० फूट उंचीच्या शिखरावर ७५ तिरंग्याचं तोरण फडकवुन प्रजासत्ताक दिवस साजरा केला होता.

वैभव यांनी आजवर सह्याद्रीतील ३०० पेक्षा अधिक किल्ले सर केले आहेत. घाटवाटा, कठीण सुळखे देखील सर केले आहेत. 

फक्त सह्याद्रीच नाही तर हिमालयातील देखील अनेक शिखरे सर केले आहेत. आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो,

 युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रस, नेपाल मधील एव्हरेस्ट बेस कॅम्प, कालापत्थर. असे अनेक शिखरे सर करत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

२०२५ मध्ये भारत भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. स्वर्णिम भारत: विरासत आणि विकास ही यंदाच्या गणतंत्र दिवसाची थीम आहे.

२६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान पूर्ण झाले पण २६ जानेवारी १९५० ला ते अमलात आणले कारण २६ जानेवारी हा ऐतिहासिक दिवस होता.

 १९३० मध्ये याच दिवशी इंडियन नॅशनल काँग्रेसने ब्रिटिशांना पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती

 आणि तो दिवस स्वराज्य दिवस म्हणून साजरा केला जात असे. त्याच दिवशी संविधान अमलात आणून तो देशाचा प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण साजरा करतो.

Post a Comment

0 Comments