सांगोला शहरातील खळबळजनक बातमी..
महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून सुसाट वेगाने धूम ठोकली
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : दुचाकीवरून तोंडाला मास्क लावून आलेल्या दोघा अनोळखी इसमांपैकी एकाने महिलेच्या मानेला पाठीमागून घट्ट पकडून गळ्यातील सुमारे १ लाख २० रुपये किमतीचे तीन तोळे
सोन्याचे दागिने हिसकावून काढून घेतले यावेळी महिलेने प्रतिकार करताच एकाने मोठ्याने दरडावून दुचाकीवरून सुसाट वेगाने धूम ठोकली.
ही घटना रविवारी सायंकाळी ६ :४५ च्या सुमारास सांगोला मस्के कॉलनी रोड नंबर ३ वर घडली. मकरसंक्रांती सणाच्या तोंडावर महिलेच्या गळ्यातील दागिने चोरीची घटना घडल्यामुळे महिला वर्गातून घबराट पसरली आहे.
याबाबत, पूनम संदीप गिड्डे रा. मस्के कॉलनी रोड नं-३ सांगोला यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
फिर्यादी पूनम गिड्डे यांच्या घराच्या बाहेर रविवारी सायंकाळी ६:४५ च्या सुमारास त्यांची मुले खेळत होती म्हणून त्या मुलांना घरात घेऊन जाण्याकरिता रोडवर आल्या असता पाठीमागून विना नंबरप्लेट दुचाकीवरून तोंडाला मास्क लावून
आलेल्या दोन इसमांपैकी एकाने त्यांच्या मानेला पाठीमागून घट्ट पकडून थोड्या अंतरावर फरफटत नेले व गळ्यातील दोन तोळे सोन्याचे मिनी गंठणसह एक तोळे गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून काढून घेऊन महिलेला रोडवर खाली ढकलून दिले
यावेळी फिर्यादी पूनम गिड्डे दोघांवर मोठ्याने ओरडल्या असता त्यांनी दुचाकी मागे वळवून एकाने फिर्यादीला दरडावून तेथून दुचाकीवरून दोघांनी सुसाट वेगाने धूम ठोकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
0 Comments