google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवस महुद येथे विविध उपक्रमांने साजरा करण्यात आला

Breaking News

सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवस महुद येथे विविध उपक्रमांने साजरा करण्यात आला

सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डाॅ.बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवस महुद येथे विविध उपक्रमांने साजरा करण्यात आला


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :- सांगोला विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त महुद चौकामध्ये भला मोठा केक कापुन व फटाक्यांची आतषबाजी करीत

 वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला ...सदर केक हा महुद नगरीतील नामवंत मल्लांच्या शुभहस्ते कापण्यात आला‌...तसेच महुद चौकात मिठाई वाटुन आनंदोस्तव साजरा करण्यात आला.

  तसेच गणपतरावजी देशमुख सभागृहामध्ये रक्तादान शिबीर आयोजीत करण्यात आले होते.सदर रक्तादान शिबीराचे आयोजन

 महुद चौकातील भाई गणपतरावजी देशमुख सभागृहामध्ये आयोजीत करण्यात आले होते.‌शिबिरामध्ये १०३ रक्तदात्यांनी रक्तादान केले असुन रक्तदात्यामध्ये महिलांचा सहभाग होता.

रक्तदान शिबिराचे आयोजन पंढरपुर ब्लड बॅंक पंढरपुर या रक्त पेढीच्या साह्याने व सौ.लक्ष्मी महेश जगधने यांच्या पुढाकाराने आयोजीत करण्यात आले होते.सदर रक्तदान शिबिराचे आयोजन शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना महुद बु!! 

यांनी आयोजीत केले होते.. सदर कार्यक्रमा प्रसंगी जि.प.गट नेते,माजी जि.प.सदस्य ,माजी पं.स.सदस्य,सरपंच व सदस्य तसेच शेकापचे चिटणिस-सहचिटणिस व शेकापचे कार्यकर्ते 

,महुद पुरोगामी युवक अध्यक्ष व पुरोगामीचे सदस्य तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी तसेच आजी माजी नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments