खळबळजनक.. अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांच्या पत्नी व मुलावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
बोगस व बनावट कागदपत्राद्वारे दस्त ; सांगोला पोलीसात तिघांविरोधात गुन्हा दाखल
सांगोला (प्रतिनिधी):- चिंचोली ता. सांगोला येथील जमिनीची बोगस व बनावट कागदपत्रे सादर करून दस्त केल्याप्रकरणी सांगोला पोलीसात
अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांच्या पत्नी व मुलासह अजून एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दिनांक १३ जानेवारी रोजी श्रीमती. अपर्णा शरद गुरव ( दुय्यम निबंधक, सांगोला) यांनी अखिल भारतीय डाळिंब संघाचे
अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांचा मुलगा प्रज्योत प्रभाकर चांदणे, पत्नी शिलादेवी प्रभाकर चांदणे दोघे रा. एखतपूर ता. सांगोला,
लोकमंगल मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटी सोलापूर तर्फे रिअल इस्टेट इनचार्ज नाजमीन आयुब शेख रा. संतोषनगर, बाळे- सोलापूर यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी ह्या दुय्यम निबंधक कार्यालय, सांगोला येथे दुय्यम निबंधक म्हणून नेमणुकीस आहेत.
सांगोला कार्यालयात मुळ अर्जदार यांनी मौज चिंचोली, ता. सांगोला येथील जमीन गट नं. 145/3 या मिळकतीमध्ये कार्यालयीन गोडावूनसाठी असलेले बांधकाम क्षेत्र 291.81 चौ. मी.
असे संपूर्ण मिळकत ही लोकमंगल मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटी लि. सोलापूर यांच्या मालकी हक्काची इमारत बांधकाम असताना
शासनाचा मुद्रांक शुल्क बुडविण्याच्या हेतून स्वार्थपोटी बनावट कागदपत्रे तयार करून दस्त क्र. 2869/2023 हा अस्तित्वात आणला असल्याचा तक्रारी अर्ज केला होता.
तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने यापुर्वीचे अधिकारी यांनी अर्जदार, गैरअर्जदार व संबंधीत लोकांना नोंदणी अधिनियम 1908 मधील कलम 82 च्या कारवाई
अंतर्गत नोटीस काढलेली होती, त्यानंतर फिर्यादी दुय्यम निबंधक यांनी दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी प्रज्योत प्रभाकर चांदणे,
शिलादेवी प्रभाकर चांदणे, लोकमंगल मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटी, तलाठी कुमाररवी राजवाडे, व तक्रारदार यांना नोटीस काढून त्यांचे म्हणणे घेतले.
त्यानंतर मुळ अर्ज, त्यातील अर्जदार व संबंधीत इसमांचे आलेले म्हणणे, दस्ताची प्रत इत्यादी सर्व कागदपत्रे त्याची पडताळणी करीत असताना, तलाठी राजवाडे यांनी दिलेले म्हणणे पाहिले असता,
सदर खरेदीपत्रासोबत दाखल असलेला गावकामगार तलाठी यांचा दाखला त्यावरील सही व शिक्का हा संबंधीत तलाठी यांचा नसल्याचे लेखी म्हणणे कार्यालयात कळविले.
सर्व बाबींचा कागदपत्राचे अवलोकन केले असता सदरचे खरेदीदस्त क्र. 2869/2023 हा बोगस व बनावट कागदपत्राचा आधार घेवून बनविलेला आहे, असे प्रथमदर्शनी दिसून येत
असल्याने अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांच्या पत्नी व मुलासह लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे रियल इस्टेट इन्चार्ज या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे
या तिघांजणा विरोधात कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याने कलम 82 खालील कारवाई व्यतिरिक्त कायदेशीर फिर्याद दाखल केली असल्याचे पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.
अनेकाला फसवून आपण सोज्वळ व धुतलेल्या तांदळासारखे आहोत असे सर्वांना दाखवीत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला फसवणारे तालुक्यातील एकमेव कुटुंब आहे
संस्थेच्या जवळच्या एखतपुर हद्दीत अनेकांच्या जमिनीत सावकारकीच्या नावाखाली चांदणे बंधूंनी फसवल्याचे सांगोला पोलिसात तक्रारी अर्ज आहेत परंतु राजकीय दबावाने कुणाचाही गुन्हा दाखल होऊ नये यासाठी यांचा प्रयत्न सुरू असतो
संस्थेमध्ये सुद्धा शिक्षकांच्या पगारातून तीन टक्के व घर भाड्याचे पैसे शिक्षकाकडून प्रत्येक महिन्याला वसूल अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे करीत आहेत
अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी यापूर्वी लागवडीची व ठिबक सिंचन ची प्रकरणे बोगस केले आहेत
त्यांच्या संस्थेच्या मुंबई उच्च न्यायालयात मोठ्या प्रमाणावर केसेस सुरू आहेत त्यांनी अनेकांना फसवणूक केले असून गुन्हे दाखल होऊ नयेत
म्हणून ते वरिष्ठापासून प्रयत्न करत असतात अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्षपद फक्त आणि फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेले आहे सर्वसामान्याला त्याचा काही उपयोग होत नाही
त्यांनी अखिल भारतीय डाळिंब संघाच्या माध्यमातून त्यांचा स्वतःचा स्वार्थ पाहिला आहे अनेक डाळिंबासाठी आलेले बोगस अनुदान शासनाचे लाटले आहे याचीही चौकशी करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे
0 Comments