google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..घेरडी येथे चोरी; १ लाख २४ हजाराच्या मुद्देमालावर चोरट्याचा डल्ला सांगोला तालुक्यातील घटना..

Breaking News

मोठी बातमी..घेरडी येथे चोरी; १ लाख २४ हजाराच्या मुद्देमालावर चोरट्याचा डल्ला सांगोला तालुक्यातील घटना..

मोठी बातमी..घेरडी येथे चोरी; १ लाख २४ हजाराच्या मुद्देमालावर चोरट्याचा डल्ला सांगोला तालुक्यातील घटना..


(शब्दरेखा एक्सप्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/प्रतिनिधीः: घरात कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटातून ६ हजार रुपये रोख व १ लाख १८ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख २४ हजाराच्या

 मुद्देमालावर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला. ही घटना २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घेरडी ता. सांगोला येथे घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की समाधान नारायण काशीद रा. घेरडी ता. सांगोला हे दी. २१ जानेवारी रोजी १० वाजता सांगोला एस. टी. आगारात कामाला गेलो होते. त्यानंतर त्यांची पत्नी व आई या शेतात बायका कामाला 

असल्याने सुमारे ११ वा. च्या सुमारास घराचे दरवाजे पुढे करुन शेत जवळ असल्याने शेतात गेल्या होत्या. दुपारी १ वा. च्या सुमारास त्या घरी परत आल्यावर त्यांनी घरात जावुन

पाहिले असता घराचे रुमधील व लोखंडी कपाततील कपडे तसेच इतर सामान अस्था व्यस्थ पडलेले दिसले. त्यावेळी फिर्यदीचे पत्नीने कपाटातील लॉकर मधील ठेवलेले

 सोन्याचे गंठण, मिनी मंगळसुत्र, दोन कर्न फुले, दोन अंगठ्या, एक गणपती व एक लहान बदाम असे दागिने पाहिले असता ते कपाटात मिळुन आले नाहीत. यावरून लक्षात आले 

कपाटातील ७ हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, २८ हजार रुपये किमतीचे १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, २० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन कर्न फुले,

 एक गणपती, एक लहान बदाम व रोख रक्कम ६० हजार रुपये असा एकूण१ लाख २४ हजार रुपयाचा मुद्देमाल कितीतरी अज्ञात व्यक्तीने चिरून नेला आहे. याबाबत समाधान काशीद यांनी पोलिसात तक्रार केली आहे.

Post a Comment

0 Comments