मोठी बातमी... अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठं यश, आरोपी अटकेत
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरामध्ये झालेल्या हल्ला प्रकरणी तीन आरोपींपैकी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोणत्याही क्षणी पोलिस आरोपीला घेऊन येणार आहेत.
तसेच आरोपीला बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये हजर केले जाऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.
आरोपी चोरटा हा लोकल ट्रेनने वांद्रयात आल्याची माहिती आहे. त्यानंतर इमारतीच्या नजीक पोहोचल्यानंतर त्याने दुसऱ्या एका इमारतीत शिरून सैफच्या इमारतीत
शिरकाव केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. इमारतीत जरी चोरटा शिरला असला तरी त्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा आहे.
इमारतीच्या लिफ्टमधून प्रवास करायलाही अॅक्सेस कार्डचा वापर करावा लागतो. त्यात इमारतीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही आहेत.
त्यामुळे सहजासहजी इमारतीच्या आत शिरणे सोप्पे नाही आहे. मात्र चोरट्याने सैफच्या घरात शिरण्यासाठी इमर्जन्सी पायऱ्यांचा वापर केला होता, अशाप्रकारे हा चोरटा सैफचा घरात शिरला आहे.
पायऱ्यांवरून घरात शिरणाऱ्या चोराचं लोकेशन ट्रेस करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी प्रभादेवीत असल्याचे समजताच पोलिसांनी चोरट्याला माग काढत
त्याला ताब्यात घेतले आहे. अद्याप दोन आरोपी फरार आहे. पोलिस या दोन आरोपींचा शोघ घेत आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, पोलीस या हायप्रोफाईल प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. सैफवर हल्ला करणारी व्यक्ती रात्रभर घरात
दबा घरून बसली होती, अशी माहिती समोर आली आहे. हल्लेखोर सैफच्या घरात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या ओळखीतला असावा
असा संशय व्यक्त केला जात आहे. सैफ अली खान याच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घरातील चार लोकांना पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे.
सैफ अली खान याचे घर वांद्रे येथे आहे. त्याच्या घराबाहेर टाइट सिक्युरिटी असते. इतकी सिक्युरिटी असूनही सैफच्या घरात चोर कसा शिरला याचा शोध सुरू आहे.
याचाच तपास करण्यासाठी क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नायक हे सैफच्या घरी पोहोचले आहेत. त्याचबरोबर फॉरेन्सिक टीमही सैफच्या घरी पोहोचले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
0 Comments