google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शास्त्रे कुटुंबीयांनी हॉटेल व्यवसायात स्वतःचा ब्रँड तयार केला : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील हॉटेल श्रीराममुळे सांगोला नगरीच्या वैभवात भर पडली : आम. डॉ. बाबासाहेब देशमुख

Breaking News

शास्त्रे कुटुंबीयांनी हॉटेल व्यवसायात स्वतःचा ब्रँड तयार केला : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील हॉटेल श्रीराममुळे सांगोला नगरीच्या वैभवात भर पडली : आम. डॉ. बाबासाहेब देशमुख

शास्त्रे कुटुंबीयांनी हॉटेल व्यवसायात स्वतःचा ब्रँड तयार केला : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील



हॉटेल श्रीराममुळे सांगोला नगरीच्या वैभवात भर पडली : आम. डॉ. बाबासाहेब देशमुख 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला :-उद्योग व्यवसाय छोटा असो की मोठा यापेक्षा त्याच्याशी प्रामाणिकपणा व निष्ठा असणे गरजेचे आहे. हीच निष्ठा ठेवून प्रत्येक उद्योग व्यवसायात यशस्वी पाऊल टाकत, शास्त्रे कुटुंबीयांनी हॉटेल श्रीराम या नावाने सहावं हॉटेल सुरू केले आहे. 

त्यांच्या कुटुंबीयांचा एकोपा आणि त्यांनी केलेल्या कष्टाचे हे मोल असून, श्रीराम हॉटेल व लॉजिंग मुळे सांगोल्याच्या वैभवात शास्त्रे कुटुंबियांनी भर टाकली आहे असे शुभेच्छापर विचार आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले.

सोलापूर कोल्हापूर हायवेवरती सांगोला बायपास जवळ शुद्ध शाकाहारी अर्थात श्रीराम प्युअर व्हेज आणि लॉजिंगचा हा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला. 

यावेळी आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन प्रसंगी फित कापण्यात आली. यावेळी शास्त्रे कुटुंबीय व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले, वासूद गावात 20 हॉटेल मालक आहेत. या गावाकडून आदर्श घेण्यासारखे आहे. सुशिक्षित असून ही बेरोजगारीचे प्रमाण

 सुद्धा मोठ्याप्रणत आहे. अशा तरुणांनी शास्त्रे कुटुंबीयांचा आदर्श घ्यावा. विशेष करून त्याच शास्त्री कुटुंबीयांनी हॉटेलमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रगती केलेली आहे. 

हैद्राबादी पनीर हे या श्रीराम हॉटेलची सुप्रसिद्ध भाजी आहे. डोक्यावरती बर्फ आणि तोंडात साखर ठेवून व्यवसाय करावा लागतो त्या पद्धतीने शास्त्रे कुटुंबीयांनी हॉटेल व्यवसायात यशस्वी पाऊल टाकले आहे.

त्यांच्या प्रत्येक कार्याला आमच्या शुभेच्छा असल्याचे शेवटी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.

यावेळी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, सांगोल्यातील हॉटेल क्षेत्राच्या वैभवात भर टाकणारा सुसज्ज असं शुद्ध शाकाहारी श्रीराम प्युअर व्हेज 

आणि लॉजिंगचा भव्य शुभारंभ संपन्न होत आहे. शास्त्रे कुटुंबीयांनी हॉटेल व्यवसायात स्वतःचां ब्रँड तयार केला आहे. अजनाळे डाळींबाचे तसेच वासुद हे गाव हॉटेल मालकांचे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही.

 मी या कुटुंबाला मनापासून शुभेच्छा देत असताना, एकत्र कुटुंब असले तर कशा पद्धतीने कुटुंबाचा विकास होतो हे या शास्त्रे कुटुंबाकडून शिकले पाहिजे. मागील अनेक वर्षापासून श्रीराम हॉटेलची

 चव आणि ग्राहकांची विश्वासहर्ता त्यांनी टिकून ठेवली आहे. यापुढे ही सोलापूर कोल्हापूर हून निघाले तरी सांगोल्यात नाश्ता व जेवण करून जायचं असा वेगळा करिश्मा ते या हॉटेलच्या माध्यमातून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत 

यातून निश्चित त्यांची प्रगती घडेल अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. प्रा. पी. सी. झपके सर म्हणाले, हायवे ठिकाणी चांगलं हॉटेल असणं काळाची गरज आहे. 

ही गरज पूर्ण झाली असं म्हटल तर वावग ठरणार नाही. यापूर्वी हॉटेल श्रीराम ची चव मी बघितली आहे. खवा आणि बासुंदी साठी वासुद गावाचे नाव प्रसिध्द होते.

 आता ही ओळख बदलली आहे. हॉटेल मालक म्हणून ही नवीन गावाची ओळख तयार झाली आहे. असे त्यांनी सांगितले. तसेच डॉ. प्रभाकर माळी यांनी, सांगोलाकर भाग्यवान आहोत.

हॉटेलची मालिका चांगली सुरू आहे. बाहेर जेवायचं म्हणलं तर चांगलं हॉटेल शोधावे लागते. ती शोध मोहीम थांबणार आहे. चांगली चव देणारे हॉटेल सुरू होत आहे. यामुळे सांगोलाकरांची सोय झाली असल्याचे सांगितले.

भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी वासुद हे गाव हॉटेल मालकांचे गाव झाल आहे. शास्त्रे कुटुंबीयांनी आहोरात्र कष्ट 

केल्यामुळे विश्व निर्माण करता आलं. मला अभिमान आहे नॅशनल हायवेवर माझ्या गावातील उद्योगपती किशोर शास्त्रे यांनी हॉटेल सुरू केले आहे. 

असेही ते म्हणाले. यासह डॉ. अनिकेत देशमुख यांनी शास्त्रे कुटुंबीयांनी हॉटेल व्यवसायात गरुड झेप घेतली आहे. श्रीराम हॉटेल चां एक ब्रँड तयार होईल. तिघांची एकजूट समाजाला आदर्श आहे. असे त्यांनी सांगितले.

या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख सागरदादा पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन इंजी. रमेश जाधव, सांगोला सूतगिरणीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर माळी, 

व्हा. चेअरमन नितीन गव्हाणे, उद्योगपती बाळासाहेब ऐरंडे, माजी सभापती बाळासाहेब काटकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंदनाना केदार, आर्किटेक्चर सूरज देशमुख, 

युवा नेते योगेशदादा खटकाळे, माजी उपसभापती संतोष देवकते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते दत्तात्रय सावंत, काँग्रेसचे नेते सुनील भोरे सर, मा. सरपंच सोमनाथ शिंदे, राजेश लोकरे, मा. नगरसेवक विजय राऊत, 

गुंडादादा खटकाळे, उद्योगपती अरुण पाटील, समर्थ उद्योग समूहाचे पांढरे, मा. सरपंच अभिजीत नलवडे, शिवाजी शेजाळ, पोपट गडदे, वैभव केदार, संजय लोले, सुनील चौगुले, महादेव दिघे, विलास नलवडे गुरुजी, भिमराव सावंत, 

अमोल खरात, विशाल काशीद, प्रमोद सावंत, संभाजी पाटील, तात्यासाहेब काशीद, गणेश बाबर, सिध्देश्वर चौगुले, बालक्षे साहेब, शशिकांत खंडागळे, बाळासाहेब पवार, विष्णुपंत केदार, डॉ. बाळकृष्ण जगताप आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक अरविंदनाना केदार यांनी केले. यामध्ये श्रीराम किराणा स्टोअर्स, श्रीराम वॉच, परत त्याच्या जोडीला श्रीराम शेती फार्म वासुद, 2012 साली हॉटेल श्रीराम नावाने वासुद चौक येथून लावले रोपटे आज वटवृक्षात रूपांतर होत आहे.

आज नव्याने श्रीराम हॉटेल व लॉजिंग सुरू केले आहे. उद्योग व्यवसाय बरोबर गावच्या विकासाला चालना देण्यासाठी किशोर शास्त्रे व परिवाराचे योगदान मोलाचे आहे.

 सरपंच म्हणून काम करताना त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन गावात विकासाचा डोंगर उभा असल्याचे त्यांनी सांगितले.

उपस्थित मान्यवरांचे हॉटेल श्रीरामचे मालक आनंदकुमार शास्त्रे, किशोर शास्त्रे, मनोज शास्त्रे, अक्षय शास्त्रे यांनी स्वागत केले. तर आभार संजय गव्हाणे यांनी मानले. यासह इर्शाद बागवान व माधुरी जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments