सांगोला तालुक्यातील अकोला गावात कुठेही दारू मिळेल; बोर्ड लागले झळकू
अकोला गावात कुठेही दारू मिळेल, असे बोर्ड नवीन वर्षाच्या स्वागताला लावण्यात आल्याने तालुक्यातील जनतेमध्ये एक चर्चेचा विषय झाला आहे.
याकडे राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी) विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
अकोला (वा) (ता. सांगोला) हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील तालुका समजले जाते. या गावात ठिकठिकाणी अवैध दारू विक्रीची दुकाने आहेत. या दुकानांमधून मिळणार्या दारूमुळे गावातील तरुण, वृद्ध व्यसनाधीन बनले आहेत.
तर गेल्या वर्षभरात दारूच्या व्यसनाने काही जणांचा मृत्यूही झाला आहे. अकोला गावात अवैध दारू विक्री बंद व्हावी, यासाठी ग्रामसभेने वारंवार ग्रामसभेचे ठरावही घेतले आहेत.
हे ठराव राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी) पोलिस ठाणे, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना देण्यात आले होते. पण अद्यापपर्यंत यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
यामुळे गावातील काही युवक एकत्र येऊन गावात चौकामधील रस्त्याच्या कडेला अकोला गावात कुठेही दारू मिळेल, असे बोर्ड लावण्यात आहे. या बोर्डवर आजपर्यंत झालेल्या ग्रामसभेच्या ठरावाचे काय झाले. अवैध दारूवर कारवाई झाली का?
याबाबत आगामी होणार्या ग्रामसभेमध्ये संबंधित पदाधिकारी व अधिकार्यांना जाब विचारला जाईल, असे जाहीर आवाहनच युवकांनी दिले आहे. यामुळे या बोर्डबाबत तालुक्यामधील जनतेमधून चर्चा होत आहे.
0 Comments