google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक.. सांगोला तालुक्यातील शिवणे येथील मंगल कार्यालयात लग्ना दिवशीच वधु पक्षाच्या कक्षेतून पळविले सोन्याचे गंठण

Breaking News

धक्कादायक.. सांगोला तालुक्यातील शिवणे येथील मंगल कार्यालयात लग्ना दिवशीच वधु पक्षाच्या कक्षेतून पळविले सोन्याचे गंठण

धक्कादायक.. सांगोला तालुक्यातील शिवणे येथील मंगल कार्यालयात लग्ना दिवशीच वधु पक्षाच्या कक्षेतून पळविले सोन्याचे गंठण


सांगोला : लग्न कार्यासाठी आलेल्या महिलेचे वधु पक्षाच्या कक्षातुन अज्ञात चोरट्याने 23 ग्रॅम वजनाचे 90 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण पळवून नेले असल्याची घटना

 शिवणे येथील मंगल कार्यालयात घडली. चोरीची फिर्याद विद्या अविनाश लेंढवे (रा. आंधळगाव ता. मंगळवेढा ) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.

याबाबत सांगोला पोलीस स्टेशनकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवार दि. 07 डिसेंबर रोजी फिर्यादी 

या मामा लक्ष्मण बाबर यांची मुलगी संजना हिचे लग्न मुक्ताई मंगल कार्यालय येथे असल्याने सकाळी 8 वाजणेचेे दरम्यान आंधळगाव ता. मंगळवेढा येथुन आल्या होत्या.

 त्यानंतर कपडे चेंज करणेकरीता कार्यालयातील वधु पक्षाच्या रुममध्ये जाऊन कपडे चेंज करुन सोन्याचे गंठण पर्स मध्ये ठेवून जेवणाच्या हॉलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेल्या होत्या. 

त्यानंतर 8.30 वाजता वधु पक्षाच्या रुममध्ये परत गेले नंतर पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण मिळुन आले नाही. याबाबत फिर्यादी यांनी लगेचच नातेवाईक व इतर लोकांकडे लग्नाचे दिवशी व लग्नाचे कार्यक्रम झालेनंतर चौकशी केली

 पंरतु सोन्याचे गंठण मिळुन आले नाही. यावरुन सोन्याचे गंठण कोणीतरी चोरुन नेले असल्याचे खात्री झाल्याने सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments