google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 केंद्र सरकारच्या केळी पिकाच्या कृषी निर्यात क्षेत्रात सोलापुर जिल्ह्याचा समावेश करावा ; वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी

Breaking News

केंद्र सरकारच्या केळी पिकाच्या कृषी निर्यात क्षेत्रात सोलापुर जिल्ह्याचा समावेश करावा ; वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी

केंद्र सरकारच्या केळी पिकाच्या कृषी निर्यात क्षेत्रात सोलापुर जिल्ह्याचा समावेश करावा ;



वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे खा. धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला  : केंद्र सरकारच्या केळी पिकाच्या कृषी निर्यात क्षेत्रात सोलापुर जिल्ह्याचा समावेश करावा या मागणीसाठी मा.खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी नवी दिल्ली येथे

 वाणिज्य मंत्री मा.पियुषजी गोयल साहेब यांची भेट घेवुन चर्चा केली व त्या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

सोलापुर जिल्ह्यात केळी लागवडीखालीत क्षेत्रात प्रचंड वाढ होत असुन सुमारे १९ हजार हेक्टर क्षेत्र केळी पिकाखाली आलेले आहे.महाराष्ट्रातील एकुण केळी निर्यातीपैकी सुमारे ५८% निर्यात सोलापुर जिल्ह्यातुन होते.

गेल्या वर्षी महाराष्ट्रातुन सुमारे ११ लाख २३ हजार ५२४ हजार मेट्रीक टन केळी एक्सपोर्ट झाली यातील सुमारे ६ लाख ४८ हजार २६२ मेट्रीक टन केळी सोलापुर जिल्ह्यातुन एक्सपोर्ट झाली आहे.

एप्रिल २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत राज्यातुन सुमारे २५ हजार कंटेनर केळीची निर्यात झाली.त्यातील १६ हजार कंटेनर केळी सोलापुर जिल्ह्यातुन निर्यात झाली आहे.

केंद्र सरकारने निर्यातीस चालना देण्यासाठी राबवलेल्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमांतर्गत सोलापुर जिल्ह्याचा केंद्र सरकारच्या केळी पिकाच्या कृषी निर्यात क्षेत्रात समावेश झाला पाहिजे यासाठी

 मा.खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी नवी दिल्ली येथे वाणिज्य मंत्री मा.पियुषजी गोयल साहेब यांची भेट घेवुन चर्चा केली व त्या संदर्भात निवेदन दिले. याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी ही मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments