google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ..सांगोला पोलिसात आणखी एक तक्रार दाखल; गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी - लक्ष्मीनगर येथील बोगस डॉक्टरच्या अडचणीमध्ये वाढ

Breaking News

खळबळजनक ..सांगोला पोलिसात आणखी एक तक्रार दाखल; गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी - लक्ष्मीनगर येथील बोगस डॉक्टरच्या अडचणीमध्ये वाढ

खळबळजनक ..सांगोला पोलिसात आणखी एक तक्रार दाखल; गुन्हा दाखल करून कारवाई


करण्याची मागणी - लक्ष्मीनगर येथील बोगस डॉक्टरच्या अडचणीमध्ये वाढ

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील लक्ष्मी नगर येथील बोगस डॉक्टरवरती दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी गुन्हा नं. ९५०- २०२४ दाखल झालेला होता.

 तो डॉक्टर आज रोजी टेबल जामिनावरती बाहेर असून त्याचा जिल्हा सत्र न्यायालय यांनी अटकपूर्व एन्ट्रीम जामीन नाकारलेला आहे. त्याच डॉक्टरांवरती लक्ष्मीनगर ता. 

सांगोला गावातील पीडित भीमराव तुकाराम गोडसे यांनी सांगोला पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे. त्यामुळे प्रवीण वीरुपक्षाप्पा बडीगेर या बोगस डॉक्टरच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे.

सदरील बोगस डॉक्टर यांनी तक्रार करणारे अर्जदारांच्या वरती मुळव्याधाचे ऑपरेशन करण्यासाठी माळशिरस येथील डॉ. प्रवीण पाटील यांच्याकडे पाठवले.

 त्यांच्या सांगण्यावरून डॉ. पाटील यांनी तिथे शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया झालेनंतर सदरील जखम दुखू लागल्याने पीडित भिमराव गोडसे दोन दिवसांनी

 त्या बोगस डॉक्टर बडीगेर यांच्याकडे गेले असता त्या डॉक्टराने त्यांच्या कमरेच्या खाली इंजेक्शन दिले. परंतु दुखणे न थांबता, त्या ठिकाणी मोठी जखम झाली. सदर जखमेबाबत बोगस डॉक्टरकडे तक्रार केली 

असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पीडित भीमराव गोडसे यांनी दिनांक १५/१२/ २०१४ रोजी सायंकाळी सांगोला पोलीस स्टेशनला अर्ज देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे 

व बोगस डॉक्टर प्रवीण बडीगेर यांच्या वरती कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार बोगस डॉक्टर वरती सांगोला पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments