google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बांगलादेशातील इस्कॉन चे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका व हिंदू अल्पसंख्यांकांचे संरक्षण करा सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

Breaking News

बांगलादेशातील इस्कॉन चे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका व हिंदू अल्पसंख्यांकांचे संरक्षण करा सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

बांगलादेशातील इस्कॉन चे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका व

हिंदू अल्पसंख्यांकांचे संरक्षण करा सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (जिल्हा सोलापूर) - बांगलादेशातील इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांच्या अन्याय अटकेविरोधात त्वरित हस्तक्षेप करण्याची आणि हिंदू अल्पसंख्यांक वरील अन्याय रोखण्याबाबत

 सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत सरकार व श्री अमित शहा केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांच्या नावे तहसीलदार यांना गुरूवार, 5 डिसेंबर या दिवशी निवेदन देण्यात आले. 

 यावेळी तहसीलदार यांच्या वतीने महसूल नायब तहसीलदार श्रीमती उदया देसाई यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने

 डॉक्टर मानस कमलापूरकर, गणपत पटेल, समर्थ कदम, प्रवीण जानकर, संतोष पाटणे सर, श्रीकांत बाबर, अभय काटकर, विशाल राजगे, नवनाथ कावळे, बिरुदेव खुळे, भीमाराम चौधरी, 

सुनील शिंदे, महेश चौधरी, कृष्णा कांबळे आधी उपस्थित होते. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कासाठी आवाज उठवणारे

 इस्कॉन चे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना अनुचित रित्या देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, हे अत्यंत दुःख आणि खंत व्यक्त करण्यासारखी घटना आहे.

 स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी हे पुंडरीक धाम चे अध्यक्ष म्हणून बांगलादेशातील हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करत होते आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवित होते.

 बांगलादेशातील हिंदू समाज जो गेल्या काही दशकांपासून अत्याचार आणि स्थलांतराचा सामना करत आहे आता अधिक ठामपणे आपल्या हक्कांसाठी आवाज उठवत आहे,

 मात्र असे देशद्रोहाचे खटले अल्पसंख्याकांना गप्प बसवण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या दडपण्यासाठी केले जात आहेत. या खटल्यामुळे धार्मिक स्वातंत्र्य आणि अल्पसंख्यांक समुदायाच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 खरे तर चत्तोग्राम येथे आयोजित शांततापूर्ण आंदोलनादरम्यान चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांनी अल्पसंख्यांक हिंदूंच्या संरक्षणासाठी कायदा आणि न्यायाधिकरण स्थापनेची मागणी केली होती

 हा कार्यक्रम पूर्णतः संविधानाच्या चौकटीत होता तथापि त्यांच्या या प्रयत्नांना दडपण्याचा आणि हिंदू अल्पसंख्यांकांचे हक्काबाबत बोलणाऱ्या आवाजांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

या निवेदनाद्वारे प्रशासनाकडे आम्ही खालील मागण्या करत आहोत* 
1. बांगलादेश सरकारवर दबाव आणून इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांची विनाअट सुटका करण्यासाठी भारत सरकारने पाऊल उचलावे आणि त्यांना आवश्यक ती सुरक्षा देण्यात यावी.

 2. बांगलादेशातील हिंदू समाजाच्या धार्मिक स्थळांचे आणि सांस्कृतिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय मंचावर बांगलादेश सरकारला जबाबदारीची जाणीव करून द्यावी. 

3 ळ . बांगलादेशातील हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी आणि मानवी हक्कासाठी संयुक्त राष्ट्र सह अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेऊन योग्य पावली उचलावी. *4* . बांगलादेश सरकारने सरकारवर दबाव आणून अल्पसंख्यांक संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी करावी.

ज्याप्रमाणे भारत सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा सीएए करून बांगलादेशातील पीडित अल्पसंख्यांक हिंदूंना भारताचे नागरिक होण्यासाठी हिंदू हिताचा एक चांगला निर्णय घेतला आहे

 त्याचप्रमाणे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकावरील अन्याय भारतासाठी केवळ शेजारील प्रश्न नसून हिंदूंच्या अस्तित्वाचा मानवाधिकार आणि धर्म स्वातंत्र्याचा संवेदनशील विषय आहे 

हिंदू वरील हे अत्याचार रोखले नाही तर त्याचे लोन भारतात येण्यास वेळ लागणार नाही म्हणून हिंदूंना भारत सरकार करून कठोर भूमिका आणि निर्णायक पावले उचलण्याची अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments