google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..सांगोला भूमिअभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..सांगोला भूमिअभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार

ब्रेकिंग न्यूज..सांगोला भूमिअभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

स्वामित्व' योजनेंतर्गत ड्रोन सर्वे 2022 साली संपूर्ण सांगोला तालुक्यामध्ये करुन त्याआधारे ग्रामपंचायत गावठाण हद्दीतील सिटी सर्वे नकाशा करण्यात आला.

या नकाशामध्ये कोणाच्या तक्रारी असतील, कोणाला हरकत असेल तर तसे अर्ज भूमिअभिलेख कार्यालयास द्यावेत. 

त्यानुसार नकाशा दुरुस्त करुन नकाशा नियमित करण्यात येईल, असे भूमिअभिलेख कार्यालयांतर्गत सांगण्यात आले.

सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायतीने भूमिअभिलेख कार्यालयास सिटी सर्वे नकाशामध्ये दुरुस्त्या सुचवल्या.

 परंतु भूमिअभिलेखचा असलेला मनमानी कारभार, कामातील निष्काळजीपणा, आपल्या कर्तव्यातील कसूर यासारख्या कारणाने

 दुरुस्त्या न करता नकाशा नियमित करण्यात आला. लोकांच्या तक्रारींचा कोणताही विचार केला नाही. 

याचा नागरिकांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु, तक्रारींची कोणतीही दखल या कार्यालयाने घेतलेली नाही. 

सिटी सर्वे झाल्यानंतर दोन वर्षे नकाशामध्ये दुरुस्त्या करुन सनद भरून न घेतल्यामुळे ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे.

 सनद भरुन घेतल्यानंतर होणार्‍या आर्थिक लाभपासून लाभार्थी वंचित राहिले. याला पूर्णपणे भूमिअभिलेख कार्यालय जबाबदार आहे.

वाणीचिंचाळे गावात भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी आले असता त्याच्यांवर चुकीचे काम केले आहे 

म्हणून प्रश्नांची सरबत्ती करुन त्यांना परत जाण्यास सांगितले. लोकांना बरोबर फेरसर्वे करुन मालमत्ता नकाशे मिळावा, अशी विनंती केली आहे.

Post a Comment

0 Comments