सांगोला तालुका कृषी विभाग सांगोला यांच्या वतीने तालुकास्तरीय जागतिक मृदा दिन कार्यक्रम संपन्न
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :तालुका कृषी विभाग सांगोला यांच्या वतीने जागतिक मृदा दिनानिमित्त मौजे वाढेगाव येथे तालुकास्तरीय जागतिक मृदा दिन कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथील कार्यक्रम समन्वयक प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर तानाजी वळकुंडे यांनी जागतिक मृदा दिन का साजरा केला जातो,
मृदा आरोग्य पत्रिकेनुसार रासायनिक खतांचा किती वापर कसा करावा, मृदेची प्रत टिकविण्यासाठी सेंद्रिय निविष्ठांचा वापर, ताग, धेंचा या सारखी हिरवळीची खते,पिकांची फेरपालट याबाबत
सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी प्रस्ताविकेमध्ये माती नमुना का तपासावे त्याचे कोणकोणते फायदे आहेत इत्यादी व कृषी विभागाच्या योजनेविषयी माहिती दिली.
व अनुसुचित जाती जमातीतील शेतकऱ्यांसाठी विविध योजनेअंतर्गत निधी शिल्लक आहे तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी mahadbt portal वर अर्ज करावे असे आवाहन केले.
मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गावातील युवक नेते संजय डोईफोडे ,गावचे उपसरपंच शिवाजी दिघे ,माजी सरपंच जालिंदर हरिबा दिघे, सोसायटीचे माजी चेअरमन धोंडीराम दादा दिघे, नारायण दिघे ,दीपक भगत ,आप्पा इंगवले
,विष्णू दिघे, सुरेश भाऊ दिघे ,बंडू चौगुले, गोरख सूर्यगंध पप्पू माने, भास्कर दिघे हे उपस्थित होते.. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सांगोला चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री मेघराज पोळ
व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री श्रीकांत सोनवणे सांगोला व कृषी कार्यालय सांगोला येथील कृषी पर्यवेक्षक मधुकर चव्हाण साहेब कृषी पर्यवेक्षक,कृषी सहाय्यक मनोज जाधव साहेब उपस्थित होते.
सूत्र संचालन कृषि पर्यवेक्षक श्रीकांत शिंदे यांनी केले व आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी सांगोला प्रवीण झांबरे यांनी केले.


0 Comments