ब्रेकिंग न्यूज..जैविक अन्नधान्याचे सेवन करणे आजच्या काळात आवश्यक आहे : डॉ. निकिताताई बाबासाहेब देशमुख
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : मानवी शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मैदानी खेळ, व्यायाम त्याच बरोबर पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे.
मानवी आहारात पालेभाज्यांचा अधिक वापर गरजेचे असून, सेंद्रिय व जैविक अन्नधान्याचे सेवन करणे आजच्या काळात आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ. निकिताताई बाबासाहेब देशमुख यांनी केले.
कै. र. य. गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृषी तंत्र विद्यालय कडलास येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन डॉ. निकिताताई बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी डॉ . सुनिता गायकवाड, उपसरपंच सुमन अनुसे, जनार्दन पंडित, प्राचार्य जे बी जाधव, जे डी . पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी डॉ . निकिता देशमुख म्हणाल्या की शेतामध्ये औषध व खताच्या मात्रा ज्यादा दिल्याने शेतीतून मिळणाऱ्या पालेभाज्या व अन्नधान्य हे रासायनिक झाले आहे. त्याचबरोबर पाणीही शुद्ध नसल्याने मानवी जीवनाला कॅन्सर व इतर रोगामुळे आरोग्यस धोका निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी शेतीवर जैविक पद्धतीचा वापर करून अन्नधान्य पालेभाज्या पिकवाव्यात व जनतेचे आरोग्य संभाळावे त्याचबरोबर मानवाला शरीर ही देणगी आहे
ती बलवान ठेवण्यासाठी योग्य आहार व व्यायाम असणे आवश्यक आहे. कडलास येथील ग्रामीण भागातील कृषी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा भरवल्या यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले .
यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ . सुनिता गायकवाड म्हणाल्या की सांगोला सारख्या दुष्काळी भागामध्ये जनतेची व पशुची सेवा करण्याच्या उद्देशाने कै . र . य . गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यामध्ये फिरता
दवाखान्याच्या माध्यमातून जनतेची सेवा केली दुष्काळीच्या वेळी जनावराची छावण्या उभारल्या त्याचबरोबर पशुसेवक पशुवैद्यकीय डॉक्टर निर्माण केले
महिलांसाठी आरोग्य सेविका शिलाई मशीन कोर्स असे विविध उपक्रम राबवले त्याच बरोबर कृषी विद्यालय स्थापन करून आदर्श शेतकरी शेतीमधील माहिती देणारे समुपदेशक असे विद्यार्थी घडवले
या विद्यालयातील विद्यार्थी विविध शासकीय व नियम शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत वअनेकांनी व्यवसायही उभा केला आहे त्याचबरोबर या संस्थेने महिलांसाठी व किशोरवयीन मुलींसाठी प्रबोधन करणारे कार्यक्रम ही राबवलेएड्स
सारख्या भया व आजारावर जनजागृतीही केली या संस्थेच्या विविध कार्यक्रमाच्या वेळी अनेक ज्येष्ठ शास्त्रज्ञ वकील व समाजसेवक यांनी या संस्थेला अनेक वेळा भेटी ही दिले आहेत व या संस्थेकडून होणाऱ्या कार्याची दखलही घेतली आहे.
या कार्यक्रमाच्या वेळी प्राचार्य जे बी. पाटील - शासकीय कृषि विव्यालय सोलापूर, जे. डी जाधव - आर जे माळी एम टी सणस- प्राचार्य कृषि विद्यालय अकलूज, घी पी करंडे -
प्रा के वि. अनगरडी, एम कांबळे-प्रा.कृ. वि बोराडे, एस एस. कोलगे कृषि तंत्र निकेतन एखतपूर, वी. एस. गायकवाड - कृ. तंत्र निकेतन वडाळा, व्ही. एम चव्हाण - क. वि बार्शी, डी के. कदम - कृ वि. बार्शी,
एस. एस कुलकर्णी - कृ. तंत्र निकेतन एखतपुर, एम यू धोत्रे - कृतं. वि गौडगाव, प्रणित राघमारे सनराज आहेरकर , सीमा बनसोडे, वैज्ञाली दबडे आदीसह खेळाडू विद्यार्थी ग्रामस्थ शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . उपस्थिताचे आभार के. एस. दिघे यांनी मांनले.



0 Comments