google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.. सोलापूर जिल्ह्यातील कामगारांची माहिती नाही दिल्यास ठेकेदारांवर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा, असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी समितीची बैठक

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.. सोलापूर जिल्ह्यातील कामगारांची माहिती नाही दिल्यास ठेकेदारांवर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा, असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी समितीची बैठक

ब्रेकिंग न्यूज.. सोलापूर जिल्ह्यातील कामगारांची माहिती नाही दिल्यास ठेकेदारांवर कारवाई;


जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा, असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी समितीची बैठक

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे कामगारांची नवीन नोंदणी करण्यासाठी 

ठेकेदारांच्या तालुकानिहाय बैठका घेऊन त्यांच्याकडून कामगारांची संख्या व माहिती घ्यावी.

कामगारांना ठेकेदाराने ९० दिवसांत ते काम करीत असल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

 माहिती न देणाऱ्या ठेकेदाराविरोधात सामाजिक सुरक्षा कायदा २००८ नुसार कठोर कारवाई होईल, असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच असंघटित कामगारांच्या नोंदणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली.

श्री. आशीर्वाद म्हणाले, आयुष्यमान भारत कार्ड, पोर्टेबल रेशन कार्ड, पीएम जीवन ज्योती बीम योजना व 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आदी योजनांचा कामगार लाभ घेत आहेत का याची माहिती घ्या. नसेल तर नोंदणी करा.

३७६२ कामगारांची नोंदणी

जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग, महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा योजना, जिल्हा परिषद, महापालिका, सार्वजनिक बांधकाम, नगरपालिका

 या सर्व यंत्रणांकडे जवळपास १२०० ठेकेदारांची नोंद आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कामगारांची संख्या ३७६२ आहे.

मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांची संख्या नगण्य असून सर्व यंत्रणांनी गतीने नोंदणी करणे गरजेचे असल्याचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments