google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महुद यात्रेतील प्रदर्शनात शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

Breaking News

महुद यात्रेतील प्रदर्शनात शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

महुद यात्रेतील प्रदर्शनात शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

महुद येथे‌ श्री खंडोबा देवाची यात्रेस सुरवात झाली असुन यात्रेमध्ये‌ खिलार जनावरांची खरेदी विक्री तर‌‌ होतच असते 

त्याबरोबर विविध जनावरांच्या प्रथम, द्वितिय,तृतीय व चतुर्थ क्रमांकांच्या निवडी करुन योग्य बक्षीस व प्रशिस्त पत्र देऊन गौरवण्यात येत असते.

श्री खंडोबा देवाच्या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे प्रदर्शन या प्रदर्शनात अनेक शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला असुन..

त्या प्रदर्शनामध्ये पाणि आडवा‌ पाणी  जिरवा,,जलशुध्दीकरण ,,पाणि फिल्टर ,,सेंद्रिय खत निर्मीती,,च़द्रयान

 3,,कार्पेट तोफ,कार्बन आॕक्झोरबर,ज्वालामुखी आशा सर्व प्रकारच्या हुबेहुब प्रतिकृती तयार केलेल्या प्रदर्शणात सहभागी झालेल्या पाहावयास मिळाल्या ...

    या प्रदर्शनात सहभागी विध्यार्थ्यांनी ज्या प्रतिकृती  तयार करुन प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे त्या पाहिल्यावर त्या विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात येतो .

   प्रदर्शनातील बनवलेल्या वस्तुंची माहीती शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी विद्यार्थ्यांना विचारली असता त्यांनी अत्यंत योग्य पध्दतीने प्रदर्शनातील वस्तुंची माहीती दिली.

त्यावेळेस यात्रा कमिटिचे माजी चेअरमन भाई भागवत सरतापे व भाई रामचंद्र चव्हाण उपस्थित होते.विशेषता केसकरवाडी जिल्हापरिषद प्राथमीक‌ शाळेतील विद्यार्थ्यांनी विशेष‌ सहभाग नोंदवला आहे.

त्या‌ शाळेचे शिक्षक सौ.वंदना पाटने- मॅडम,मा.उमेश महाजन- सर,मा.धुळा सातपुते- सर ,मा.विठ्ठल तांबवे- सर हे स्वता प्रदर्शन स्थळी उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन‌ करीत होते...

Post a Comment

0 Comments