google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ! पोलीस असलेल्या वर्गमित्रानेच केला 36 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून ; शौचालयाच्या टाकीत लपवला मृतदेह, बडतर्फ पोलीस कर्मचारी असलेल्या आरोपीला अटक -

Breaking News

खळबळजनक ! पोलीस असलेल्या वर्गमित्रानेच केला 36 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून ; शौचालयाच्या टाकीत लपवला मृतदेह, बडतर्फ पोलीस कर्मचारी असलेल्या आरोपीला अटक -

खळबळजनक ! पोलीस असलेल्या वर्गमित्रानेच केला 36 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून ;


शौचालयाच्या टाकीत लपवला मृतदेह, बडतर्फ पोलीस कर्मचारी असलेल्या आरोपीला अटक - 

चिमूर येथील गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह सोमवारी (दि.10) रोजी नागपूर शहराजवळील हरिश्चंद्रवेळा गावाजवळ निर्जनस्थळी आढळून आला असून अरुणा काकडे (वय 37) असे मृतदेह आढळून आलेल्या महिलेचे नाव आहे.

अरुणा काकडे या 26 नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी मार्केटमध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्या परत आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. 

दरम्यान या महिलेच्या हत्येप्रकरणात पोलीसांनी नरेश डाहूले या चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतील बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमूर येथील देवांश जनरल स्टोर्सच्या संचालिका अरुणा काकडे या 26 नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी

 मार्केटमध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्या घरी न परतल्याने कुटुंबियांनी चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

 त्यानुसार नागपूर आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आरोपीचा छडा लावला आहे. बडतर्फ पोलीस कर्मचारी नरेश डाहूले याने अरुणा काकडे या महिलेचा खून केल्याचे उघड झाले आहे.

मृत महिला आणि आरोपी आहेत वर्गमित्र

अरुणा काकडे आणि आरोपी नरेश डाहूले लहानपणापासून एकाच शाळेत शिकले असून दोघे वर्गमित्र होते. 26 तारखेला मृत अरुणा आणि आरोपी नरेश नागपूरला एकत्र होते.

 या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उडत होते. दोघे नागपूरला गेले असताना दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आरोपीने अरुणा यांचा गळा आवळून हत्या केली.

महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह हरिश्चंद्रवेळा येथील निर्जनस्थळी असलेल्या एका घरातील शौचालयाच्या टाकीत लपवून आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी कॉल रेकॉर्डच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. 

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेत कर्मचारी असलेल्या नरेश डाहूलेचा चंद्रपूर शहरातील अनेक घरफोड्यांमध्ये समावेश आढळला होता. याच आरोपावरुन मागील वर्षी त्याला अटक करुन पोलीस दलातून बडतर्फ देखील करण्यात आले होते. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments