google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सांगोल्यात आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानेच अदृष्य शक्ती?;पुन्हा तीन महिन्यात निवडणूक रणसंग्राम चर्चा तर होणारच

Breaking News

मोठी बातमी..सांगोल्यात आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानेच अदृष्य शक्ती?;पुन्हा तीन महिन्यात निवडणूक रणसंग्राम चर्चा तर होणारच

मोठी बातमी..सांगोल्यात आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलणार


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानेच अदृष्य शक्ती?;पुन्हा तीन महिन्यात निवडणूक रणसंग्राम चर्चा तर होणारच    

विधानसभा निवडणुकीनंतर जय पराजयाच्या चर्चा रंगल्या होत्या. गेली अडीच वर्ष सांगोल्यासह महाराष्ट्रात गद्दार याबाबत चर्चा होत असतानाच,गेली पंधरा दिवस तालुक्यात डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विजयानंतर अदृश्य शक्तीचाही पाठिंबा होता, असा दावा केला होता.

 ती शक्ती कोणती याबाबत तालुक्यासह जिल्ह्यात त्याची उत्सुकता लागली होती.ती अदृश्य शक्ती म्हणजे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हीच असल्याचे स्पष्ट होऊ लागल्याने

 पुरोगामी विचारसरणीच्या तालुक्यात प्रतिगामी विचारसरणीचा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे कसे राहतात,याकडे नेत्यासह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

सांगोला नगरपरिषद व जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत 1967 पासून शेकाप व साळुंखे पाटील यांची काही काळ छुपी व काही वेळेस उघड मैत्री ही 2019 पर्यंत होती. परंतु 2024 च्या निवडणुकीत स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पश्‍चात प्रथमच

 लोकसभा व विधानसभा निवडणूक झाली. पुरोगामी विचारसरणीचा तालुका म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित असून,शेकापचा बालेकिल्ला समजला जात आहे. तरीही विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

 होऊन शेकाप व शिवसेना ठाकरे गट स्वतंत्रता निवडणूक लढले यात दोन्ही शिवसेना गटाचा पराभव झाला.  शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख हे विजयी झाले.सदर निवडणुकीत पराभूत उमेदवारांनी चिंतन बैठकीचे आयोजन 

करून पराभवाचे खापर शिवसेना ठाकरे गटाने महाआघाडीतील घटक पक्षावर ढकलले तर महायुतीचा पराभव शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दीपक साळुंखे पाटील यांनी ऐनवेळी धोका दिल्याने झाला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बापू व आबांनी एकत्र यावे अशी विचारधारा निर्माण झाली आहे. तर शेकाप चा विजय हा अदृश्य शक्तीमुळे झाला असल्याचा दावा पाटील गटाचे कार्यकर्ते करीत आहेत. 

विधानसभेच्या निवडणुकीतील तापलेल्या तव्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची पोळी भाजून घ्यावी या दृष्टीने विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर  तसा प्रयत्न चालू ठेवल्याचे दिसून येत आहे.

 त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही एक ते दोन महिन्यात निश्‍चित होणार अशी शक्यता आहे. त्या निवडणुकी प्रसंगी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

सध्या तरी शेकापचे महाविकास आघाडीशी फारसे सख्ख्या नसल्याचे दिसून येत आहे विद्यमान आमदार डॉ.देशमुख यांनी भाजपशी जोडून घेण्याचे ठरविलेले दिसत आहे.

त्या दृष्टीने त्यांनी सांगोला येथे विज्ञान महाविद्यालयाच्या पटांगणातर स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावर प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन केले होते.

 तेव्हापासून त्यांचे संबंध असून त्यानंतर उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांच्या पुढाकारांनी मान तालुक्याचे आम.जयकुमार गोरे व जतचे आम.गोपीचंद पडळकर यांचे मदतीने

 सांगोल्याचे आम.डॉ.देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस पर्यंत लोकसभा व विधानसभा निवडणुकी प्रसंगी पोहोचले असल्याची खाजगी चर्चा होतीच परंतु निवडणुकीनंतर त्यांच्या भेटीगाठीवरून अधिकच तालुक्यात चर्चा रंगलेली दिसून येत आहे. 

तालुक्याच्या विकासासाठी गणपतराव देशमुख यांचेही सर्व पक्षातील नेत्यांशी मैत्रीचे संबंध होते त्या दृष्टीने डॉ.बाबासाहेब देशमुख हेही त्यांचे अनुकरण करत असतील अशी चर्चा आहे.असे होणे गरजेचे आहे,असे मत व्यक्त होत आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीतील मतांची आकडेवारी पाहिली तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बापू व आबा एकत्र आल्यास शेकापला सदर निवडणूक जड जाण्याची भीती आहे .

त्या दृष्टीने दोन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पराभवाच्या चिंतन बैठकीत एकमेकांना टाळी द्यावी 

अशी विनंती केली आहे. परंतु त्या दृष्टीने अद्याप तरी हालचालीला वेग आला नाही.जर एकत्र आल्यास शेका पक्ष काय भूमिका घेते हेही महत्त्वाचे आहे.

 आबांच्या कार्यकर्त्यातील 80 टक्के कार्यकर्त्यांचे मत बापूशी युती करावी हे उघड मागणी करतात तर वीस टक्के कार्यकर्त्यांचं मत पूर्वीप्रमाणे शेकापशी युती करावी असे आहे. परंतु ते उघड बोलत नाहीत .

याबाबत आबा काय भूमिका घेतात अद्याप त्यांनी स्पष्ट जाहीर केले नसले तरी त्याबाबत लवकर निर्णय होणे गरजेचे असे खाजगीत बोलतात. तर बापूचे कार्यकर्ते म्हणतात

 की ऐंशी टक्के मराठा समाज बापूच्या पाठीशी असून ते विधानसभेच्या निवडणूक प्रसंगी दिसून आला आहे. अल्पसंख्यांकाच्या मतात विभागणी झाल्यामुळेच आबांचे मताधिक्य वाढले आहे ते जर मते आम्हाला मिळाले

 असती तर आमचा विजय निश्‍चित होता म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवायची व विजय संपादन करायचा असा दावा करीत आहे. 

शेकापने अद्याप भूमिका जाहीर केली नाही आबा व बापू एकत्र आल्यास बाबासाहेबाला निवडणूक जड जाणार हे मात्र निश्‍चित आहे.

त्या दृष्टीने आबाची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महत्त्वाची असल्याने बापू व बाबा हे आबा बाबत काय भूमिका घेतात

 याकडे लक्ष लागलेले दिसून येत आहे. तालुक्यात लहान प्रादेशिक शिवसेना शिंदे ठाकरे गट व शेकाप प्रबळ आहे.परंतु राष्ट्रीय पक्ष समजले जाणारे भाजप काँग्रेस मात्र तालुक्यात नगण्य आहे.

Post a Comment

0 Comments