अशोक कामटे संघटनेचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन . मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी समस्यांविषयी तात्काळ तोडगा काढावा:- अशोक कामटे संघटना
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी)शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना रेल्वेच्या
विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनामध्ये खालील प्रमाणे प्रामुख्याने आवश्यक मागण्या करण्यात आले आहे.
कोल्हापूर - कलबुर्गी - कोल्हापूर सेवा दररोज सकाळी 6.30 च्या सुमारास कोल्हापुरातून सुरू करावी.
ट्रेन-11027,11028 दादर-सातारा-दादर एक्स्प्रेस या गाडीस प्रवाशाचा प्रतिसाद पाहता तीन दिवसांऐवजी दररोज सोडली पाहिजे.
ट्रेन क्रमांक-22155 आणि 22156 कलबुर्गी-कोल्हापूर- कलबुर्गी या ट्रेनचा थांबा माढा, मोडनिंब, म्हसोबा डोंगरगाव, जतरोड, ढालगाव, सलगरे स्टेशनवर थांबा गरजेचा आहे.
मिरज-कुर्डूवाडी-मिरज डेमो सेवा कोल्हापूरपर्यंत वाढवावी.
कुर्डुवाडी-कोल्हापूर ही गाडी संध्याकाळी 5.00 वाजता सुरू करावी कारण कुर्डुवाडी ते मिरज, दुपारी एक नंतर कोल्हापूरला सुमारे 19-20 तासांसाठी या मार्गावर ट्रेन सेवा नाही.
कुर्डुवाडी - मिरज - कोल्हापूर रेल्वे मार्गावर आवश्यक ठिकाणी क्रॉसिंग पॉईंट वाढवावेत ,
सांगोला, ढालगाव, कवठेमहांकाळ स्थानकावर कोच इंडिकेटरची सोय करावी,
सांगोल्यात 32A ब्रिजवर उड्डाणपुलाचे बांधकाम करावे . तरी या मागण्यांची पूर्तता रेल्वे प्रशासनाने तात्काळ करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे.
या निवेदनाच्या प्रती खासदार धनंजय महाडिक,धैर्यशील मोहिते-पाटील, प्रणिती शिंदे, धैर्यशील माने व मध्य रेल्वेचे
महाव्यवस्थापक, मुंबई, विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुणे, सोलापूर यांनाही देण्यात आल्याची माहिती शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आली.
चौकट:-
महाव्यवस्थापकानी सोलापूर दौऱ्यात मागण्यास मंजुरी द्यावी
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक(GM) हे शुक्रवारी दि 13 रोजी सोलापूर दौऱ्यात (जिल्ह्यात)विभागात, रेल्वे कामाच्या पाहणी,
आढाव्यांकरीता येत आहेत तरी या समस्या प्रशनी डोंगरगाव, जत रोड, ढालगाव , कवठेमंकाळ,सलगरे येथील ग्रामस्थांनी थांब्याबाबत ग्रामपंचायतची ठराव ही रेल्वे विभागाला संघटनेद्वारा दिलेले आहेत.
तरी त्यांनी मिरज-कुर्डूवाडी या मार्गातील स्थानकांच्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित रेल्वेमागण्या व समस्या यांचे निराकरण करावे अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे. या मुद्यांचे निवेदन अनेकवेळा रेल्वे विभागाकडे दिलेले आहे.
नीलकंठ शिंदे:-संस्थापक अध्यक्ष शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना सांगोला.
0 Comments