खळबळजनक घटना! सोलापुरात अर्धनग्न अवस्थेत मुलीसमोर थांबून हिडीस कृत्य
सोलापूर (प्रतिनिधी) टेलरच्या दुकानात मोबाईल बघत असलेल्या लहान मुली समोर येऊन अर्धनग्न अवस्थेत उभा राहून मनास लज्जा उत्पन्न होईल
असे कृत्य केल्याप्रकरणी युवकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.या घटनेची हकीकत अशी की,फिर्यादीचे शहरात टेलरचे दुकान आहे.
शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी हा मुलीस दुकानात सोडून बाहेर गेला असताना आसिफ रफिक शेख (रा.सोलापूर) या युवकाने दुकानासमोर येऊन असे कृत्य केले.
ही घटना मुलीने वडिलांना सांगितली.जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात आसिफ शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास पोलीस पोलीस निरीक्षक बामणे हे करत आहेत.
0 Comments