ब्रेकिंग न्यूज..सोलापूर जिल्ह्यातील बड्या नेत्यांना दणका!
संचालकांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन वसुली करण्याचे आदेश
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सोलापूर जिल्हा बँक बेकायदेशीर कर्ज वाटप केल्याप्रकरणी बड्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, दोन अधिकारी आणि
एका ‘सीए’सह ३५ जणांची मालमत्ता ताब्यात घेऊन २३८ कोटी ४३ लाख ९९९ रूपये १२ टक्के व्याजासह रक्कम वसूल करावी, असे आदेश विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी काढले आहेत.
त्यामुळे जिल्हा बँकेचे माजी संचालक विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप सोपल, दिपकआबा साळुंखे-पाटील, बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे, रश्मी बागल कोलते-पाटील, राजन पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील यांना दणका बसला आहे.
बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने मालमत्ता वसूल करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार बँकेकडून चौकशी आणि कारवाई सुरू झाली आहे.
दरम्यान सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी 83 आणि 88 कलमान्वये चौकशी करण्यात आली. यात तत्कालीन संचालक मंडळाने नियमबाह्य कर्ज घेतल्याचे स्पष्ट झाले.
बँकेच्या संचालकांनी स्वत:चे साखर कारखाने, शिक्षण संस्थांसाठी बेकायदेशीर कर्ज घेतले. पण, कर्ज भरले नसल्याने बँक आर्थिक अडचणीत आली.
त्यामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांसह ३५ जणांकडून २३८ कोटी ४३ लाख ९९९ रूपये आणि कर्ज घेतल्यापासून १२ टक्के व्याजासह रक्कम वसूल करण्याचे आदेश चौकशी अधिकारी किशोर तोष्णीवाल यांनी दिले आहेत.
या आदेशानानंतर सुर्वे यांनी संचालकांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन वसुली करण्याचे आदेश जिल्हा मध्यवर्ती बँकेला दिले आहेत.
0 Comments