google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोनलवाडीत शेकापला खिंडार, कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Breaking News

सोनलवाडीत शेकापला खिंडार, कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

सोनलवाडीत शेकापला खिंडार, कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश



सांगोला : तालुका प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून तसेच पक्ष नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून सांगोला तालुक्यातील सोनलवाडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार 

दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेतली. सोनलवाडीतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शेकापला खिंडार पडले आहे.

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर 

सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष आणि शहाजीबापू गटामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शेकापसह शहाजीबापू पाटील गटाला सोडचिट्टी देत

 आतापर्यंत हजारो कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे. 

सोनलवाडी ता.सांगोला येथील समाधान शिंदे, विक्रम शिंदे, दादा शिंदे, स्वप्निल शिंदे, हणमंत शिंदे, पोपट शिंदे, रामचंद्र शिंदे, पांडुरंग शिंदे, संदीप शिंदे, मारुती शिंदे, सौरभ नवत्रे, सिद्धेश्वर घाडगे,

 सागर बोडरे, सुनील बोडरे, औदुंबर मोरे, पांडुरंग मोरे, लखन मोरे, राकेश वाघमारे, सागर बोडरे, शैलेश मोरे, दत्ता बोडरे, संचित हजारे, सुधीर वाघमारे, 

राजकुमार मोरे, रोहन मोरे, आकाश वाघमारे, पियुष मोरे, सुरज वाघमारे, मनीष साळवे, हर्ष बनसोडे, निशांत जाधव या कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजय करण्याची ग्वाही दिली.

Post a Comment

0 Comments