धक्कादायक प्रकार! झोपेत उंदीर चावल्यानंतर चौथ्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू; सोलापूर जिल्ह्यातील घटना
राहत्या घरात झोपेत उंदीर चावल्याने इसमाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा प्रकार २ नोव्हेंबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडला.
प्रशांत सोपान जगताप (वय ४९, रा. रेल्वे लाईन, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. प्रशांत जगताप हे १ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे घरात रात्री जेवण करून झोपले होते.
२ नोव्हेंबरच्या पहाटे १ वाजता झोपेत त्यांच्या डाव्या हाताला उंदीर चावला. त्यांना त्रास होऊ लागल्याने वडील सोपान जगताप यांनी १.३० वाजता उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
0 Comments