ब्रेकिंग न्यूज.. सांगोला तालुक्यात दलित ऐक्य एल्गार बैठकीस दलित
समाजाचा रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद :- सुरजदादा बनसोडे
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
लिंक वर क्लिक करा https://youtu.be/_sSq4hLJqs0?si=In9Yzm1nnfAUHqfJ
सांगोला:- आज शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सांगोला भीमनगर येथील बौद्ध विहारा मध्ये नगरसेवक व रिपब्लिकन पँथर ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष सुरजदादा बनसोडे
यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनपर सांगोला तालुका दलित ऐक्य बैठक वजा मेळावा घेण्यात आला या बैठकीस दलित समाजाची लक्षवेधी व अभूतपूर्व उपस्थिती होती
या बैठकीस , जुणोनी चे तानाजी कांबळे , मांजरी विनोद रणदिवे , महूद स्वप्नील सावंत , वाकी घेरडीचे गणेश कांबळे , कमलापूर पप्पू ऐवळे , वाकी शिवणे दिपक होवाळ , सावे अभिमन्यू कांबळे ,
घेरडी काटे , घेरडी सचिन गेजगे , आदींनी आपले विचार व्यक्त केले. सदरच्या बैठकीस सांगोला तालुक्यातील दलित बांधवांची अभूतपूर्व उपस्थितीती होती.
या बैठकीस मार्गदर्शन करताना सुरजदादा म्हणाले की ही बैठक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्राय असणारा दलित समाज एकसंघ आणि एकत्रित असावा ह्या साठी आयोजित केली आहे
, सध्या तालुक्यातील राजकीय वातावरण पाहता प्रस्थापित पाटील / देशमुख ही नेते मंडळी आपल्या राजकीय स्वार्थासाठी दलित समाजात जाणीव पूर्वक फूट पडण्याचा प्रयत्न करत आहेत ,
आणि दलित समाजातील काही स्वयंघोषित पुढारी वयक्तिक स्वार्था साठी दलित समाजात फूट पडण्याचा प्रयत्न करीत आहेत उदा मातंग समाजाच्या वेगळ्या बैठका घेणे , होलार समाजाच्या वेगळी मिटिंग घेणे हे प्रकार सुरू आहेत ,
हे स्वयंघोषित दलित नेते 5 वर्ष दलित समाजाच्या किंवा त्यांच्या स्वतःच्या समाजावर कुठे अन्याय अत्याचार झाला की कुठेही आंदोलन करताना दिसत नाहीत आणि निवडणुका आल्या की संघटना काढून
मी माझ्या समाजाचा नेता आहे असे दाखवून पाटील , देशमुख नेत्यांकडून काही तरी चिरी मिरी मिळविण्याच्या हेतून समाजकार्य दाखवण्याचा प्रयत्न करतात अशा दलाल नेत्यांची दुकानदारी बंद पाडण्यासाठी ही बैठक आयोजित केली
असल्याचे सांगितले पुढे सुरजदादा म्हणाले की ह्या बैठकीस तालुक्यातील दलित समाज एवढ्या मोठया संख्येने उपस्थित राहील असे वाटले न्हवते , येणाऱ्या निवडणुकीत तालुक्यातील दलित समाज योग्य निर्णय घेऊन
दलित दलित समाजाला नक्कीच स्वाभिमान मिळवून देईल , मी थोड्या वेळेत समाज बांधवांना भेटून काहींना फोन वर संपर्क साधला आणि तुम्ही एवढ्या मोठया संख्येने उपस्थित राहिला त्या बद्दल सुरजदादा बनसोडे यांनी तालुक्यातील
दलित बांधवांचे आभार मानले निवडणुका आल्यावर दलित स्वयंघोषित नेते मंडळी समाजामध्ये पाटील देशमुख यांचा प्रचार करण्यास आल्यास त्याना एवढंच विचारा
की पाच वर्षे तुम्ही कुठे असता आणि आता निवडणूक आली की समाज आठवला का असा जाब त्यांना विचार आणि स्वाभिमानाने येणाऱ्या विधान सभेच्या तयारीला लागण्यास सांगितले



0 Comments