google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला- पंढरपूर महामार्गावर रंबलर गतिरोधक करावेत :-अशोक कामटे संघटना

Breaking News

सांगोला- पंढरपूर महामार्गावर रंबलर गतिरोधक करावेत :-अशोक कामटे संघटना

सांगोला- पंढरपूर महामार्गावर रंबलर गतिरोधक करावेत :-अशोक कामटे संघटना 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला- पंढरपूर महामार्गावर रंबल गतिरोधक करावेत अशी मागणी कार्यकारी अभियंता, रस्ते परिवहन व राज्य

 महामार्ग सोलापूर विभाग यांच्याकडे शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. 

NH 965C या सांगोला -पंढरपूर मार्गावर वाढेगाव नाका परिसर (पाटील चौक),जलशुद्धीकरण केंद्र, फॅबटेक बस स्टॉप या दोन्ही ठिकाणी तीव्र उतार व वळण असल्याने दोन्ही बाजूकडील 

वाहने रस्त्याचा योग्य अंदाज नसल्याने वेगात धावत असल्याने या परिसरात दररोज छोटे-मोठे अपघात होतात या अपघातामध्ये आत्तापर्यंत वर्षभरात नऊ ते दहा नागरिकांना आपला अनमोल जीव गमवावा लागला आहे. 

तरीहि एमआरडीसी, महामार्ग विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे विशेष म्हणजे हा भाग पोलीस विभाग,महामार्ग विभागाने ब्लॅक स्पॉट जाहीर केला आहे,या पुढील काळात अशा घटना 

टाळण्याकरिता या परिसरात दोन्ही बाजूला रंबलर स्ट्रिप गतिरोधक बसवावेत अशी मागणी वाहनधारकातून व नागरिकांतून होत आहे तरी या परिसरात रंबलर गतिरोधक तात्काळ बसवावेत . या निवेदनाचा प्रती 

जिल्हाधिकारीसो, सोलापूर 

 पोलीस अधीक्षक, सोलापूर (ग्रामीण)तहसीलदार ,सांगोला यांनाही देण्यात आले आहेत. यावेळी अशोक कामटे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments