ब्रेकिंग न्यूज ! लाडक्या बहिणींना खुशखबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये…
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा करत लाडकी बहीण योजनेंतर्गत पुन्हा एकदा लाभार्थी महिलांना दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार असल्याची घोषणा केली आहे.
यापूर्वीदेखील सरकारने या प्रकारचा निर्णय घेत रक्षाबंधनाला महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा एकत्रित हफ्ता म्हणजेच तीन हजार रुपये जमा केले होते.
आता पुन्हा एकदा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये दहा ऑक्टोबरच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची घोषणा अजितदादा यांनी केली आहे.
मी बोलतो तसा वागतो हा अजितदादांचा वादा आहे. रक्षाबंधनला जसे तीन हजार रुपये दिले तसेच भाऊबीजेलादेखील माझ्या बहिणीला मी खाली हाताने पाठवणार नाही
आणि तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार हाच माझा वादा आहे, असे अजितदादा म्हणाले.
0 Comments