google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना.. दोन टन तैवान पेरुची चोरी ;

Breaking News

सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना.. दोन टन तैवान पेरुची चोरी ;

सांगोला तालुक्यातील खळबळजनक घटना.. दोन टन तैवान पेरुची चोरी ;

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):- शेतकऱ्याने रात्री तैवान जातीच्या पेरुचा ६० रुपये प्रति किलो दराने व्यापा-यासोबत सौदा केला आणि दुस-या दिवशी व्यापाऱ्यांसोबत शेतकरी बागेत गेले असता कष्टाने पिकवलेले एका एकरातील सुमारे १ हजार झाडांवरील

 सुमारे १.२५ लाख रुपयांचे दोन टन पेरुचा माल चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार रविवार २९ सप्टेंबर रोजी सकाळी नरळेवाडी ता सांगोला येथे उघडकीस आला.

मोठ्या कष्टाने पिकवलेले पेरुची फळे चोरीला गेल्यामुळे तरुण शेतकऱ्याच्या पायाखालची माती तर सरकलीच पण बागेत पाहून त्यांना अश्रूही अनावर झाले. याबाबत , अण्णासाहेब आप्पाराव शिंदे – नरळेवाडी या शेतकऱ्यांनी 

सांगोला पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली आहे. याबाबत , नरळेवाडी येथील अण्णासाहेब शिंदे या तरुणाने मुंबई येथील सिनेसृष्टीतील व्यवसाय सोडून कोरोना काळात गावी आला. 

गावी आल्यानंतर त्यांने वडिलोपार्जित सुमारे २२ एकर शेतीची मशागत करून शेतीची सुधारणा केली. शेतीत केळी,केशर आंबा, ऊस मका त्याचबरोबर दीड वर्षापूर्वी तैवान जातीच्या पेरूची एकरात सुमारे १ हजार झाडांची लागवड केली.

 गेली दीड वर्ष सुमारे २ .२५ लाख रुपयेची रासायनिक खते, महागडं औषधे फवारणी करून मोठ्या कष्टाने बाग जोपासल्याने पेरूची झाडे फळांनी लकडलेली होती.

अण्णासाहेब हा पेरुच्या विक्रीसाठी व्यापाऱ्याच्या शोधात होता दरम्यान शनिवारी रात्री त्यांनी व्यापाऱ्यासोबत सौदा करुन प्रति किलो ६० रुपये दराने पेरूची विक्री केली होती दरम्यान रविवारी सकाळी व्यापाऱ्यासोबत 

आण्णासाहेब बागेत गेला असता झाडाला पेरू नसल्याचे पाहून व्यापाऱ्यांने तुम्ही तर मला झाडाला पेरुचा माल भरपूर आहे, जास्त बॉक्स घेऊन या म्हणून बोलला होता. बागेत तर झाडाला पेरुचे फळच दिसत नाही असे म्हणताच शेतकरी 

अण्णासाहेब शिंदे यांनी झाडांची आजूबाजूला पाहणी करीत संपूर्ण बागेची फेरफटका मारला असता झाडांवरील सुमारे दीड ते दोन टन पेरूचा माल गायब असल्याचे त्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना धक्काच बसला. 

त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शेतकऱ्यांकडे रात्री बागेत कोणी आले होते का ? याबाबत चौकशी केली असता काहीच माहिती मिळाली नाही.

Post a Comment

0 Comments