सोलापूर जिल्ह्यात भरलेल्या लोक अदालतीमध्ये तडजोडीअंती 10 हजार 990 प्रकरणे निकाली
सोलापूर :बैंकेचे थकीत कर्ज कस भरायचं.. घरातील वाद कधी मिटवायचं. यासह अनेक समस्यांनी ग्रासलेल्या लोकांना
शनिवार दि.28 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यात भरलेल्या लोकअदालतीमुळे दिलासा मिळावा. काहींच्या कौटुंबिक वादावर पडदा पडून पती पत्नी एकत्रीत आले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे शनिवारी घेण्यात आलेल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकारणातर्फे शहर व जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकअदालती
अंतर्गत 10 हजार 990 प्रकरणे सामंजस्याने निकाली काढन्यात आली आहेत. दरम्यान, विविध खटल्यांमध्ये 81 कोटी 5 लाख 81 हजार 360 रुपयांची तडजोड करण्यात आली.
लोकअदालतीचे उद्घाटन मा. अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांचे हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगती जिल्हा न्यायाधीश पी.एस. खुणे, महाराष्ट्र व गोवा बार कॉन्सिलचे सदस्य ॲङ मिलिंद थोबडे, जिल्हा सरकारी वकिल ॲङ प्रदीपसिंह राजपूत,
सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अमित आळंगे, जिल्हा न्यायालयाचे प्र.प्रबंधक एम.के.ढोबळे आदी उपस्थित होते. जिल्हा न्यायालयासह सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये दिवसभर लोकअदालत घेण्यात आली.
लोकअदालतीमध्ये 39 हजार 110 प्रलंबित प्रकरणे, 51 हजार 435 दाखलपुर्व प्रकरणे असे एकुण 90 हजार 545 प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी 4 हजार 607 प्रलंबित प्रकरणात तडजोड झाली. 6 हजार 383 दाखलपूर्व प्रकरणे अशी एकुण तडजोडीने निकाली काढण्यात आली.
सदर लोकअदालतीच्या पॅनलवर पी.एस.खुणे, एस.व्ही.केंद्रे, श्रीमती एस.एन.रतकंठवार, श्रीमती. एन.के. कोठुळे, श्रीमती. डी.डी.कोळपकर, पी.बी.वराडे, श्रीमती ए.एस.बिराजदार, डी.जी.कंखरे, पी.पी.पेठकर,
एस.आर.सातभाई, श्रीमती आर के.जंगम, श्रीमती. पी.व्ही.चव्हाण या न्यायाधीशांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. तसेच पॅनल सदस्य म्हणून लोकअभिरक्षक
कार्यालयातील विधिज्ञ स्नेहल राऊत, एस.एम.झुरळे, एम.बी.सोनलकर, रेवण पाटील, जी.बी.नवले तसेच विधीज्ञ एन.के.वाडेकर, आर.आर.बिराजदार, एस.एस.मोरडे, वि.वि.कुरले, आदींनी काम केले पाहिजे.
सदर लोकअदालत यशस्वी करण्या करीता जिल्हा विधीसेवा प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.मो.सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे सचिन श्री. उमेश देवर्षी
तसेच पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस अधिक्षक अतुल कलकर्णी, महापालिका आयुक्त श्रीमती. शीतल तेली, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, डीसीपी श्रीविजय कबाडे यांचे सहकार्य लाभले
तसेच जिल्हा न्यायालय सोलापूर व विधी सेवा प्राधिकरण येथील कर्मचारी, लोक अभिरक्षक कार्यालयातील विधीज्ञ व कर्मचारी यांना लोकअदालत यशस्वी करण्याकरीता परीश्रम घेतले.
स्पेशल ड्राईव्ह:- लोकन्यायालयाच्या अगोदर मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 5 दिवस स्पेशल ड्राईव्ह प्रत्येक प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयात घेण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यामध्ये सदर 5 दिवसांमध्ये 3 हजार 380 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यापैकी पाच वर्षे जुनी 563 खटले, 10 वर्षे जुनी 63 खटले, 15 वर्षे जुनी 6 खटले,
20 वर्षापेक्षा जास्त प्रलंबित असलेल्या एक खटला, तीस वर्षापेक्षा जास्त प्रलंबित असल्याने दोन खटले, चाळीस वर्षापेक्षा जास्त प्रलंबित असलेला एक खटला निकाली काढण्यात आला.
महानगरपालीका:- सोलापूर शहरातील मिळतीचे थकीत कर व गाळा भाडे वसुलीकरीता दाखपुर्व प्रकरणे महानगरपालीका
सोलापूर यांच्या वतीने लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेली होती. सदर लोकअदालतीमध्ये आयुक्त शीतल तेली-उगले, सहायक आयुक्त आशिष लोकरे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले,
व करआकारणी प्रमुख युवराज गाडेकर करसंकलन विभागातील सर्व कर्मचारी यांचे मालमत्ता मिळकत धारक व गाळे धारक यांचे लोकन्यायालयात यशस्वी होण्याकरीता मोलाचे सहकार्य लाभले.
सदर पॅनलचे आयोजन महानगरपालीका आवारातच करण्यात आले होते. व त्याकरीता पॅनल प्रमुख म्हणुन पी.पी.पेठकर व पॅनल विधिज्ञ म्हणून रेवण पाटील यांनी काम पाहिले.
सदर लोकअदालतीमध्ये महानगरपालिकेचे 1 हजार 801 दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीअंती निकाली असून रक्कम रुपये 12 कोटी 23 लाख 76 हजार 277 इतकी कर भाडे पोटी आकारणी झालेली आहे.
मोटार वाहन प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये शहर वाहतुक शाखा व ग्रामीण वाहतूक शाखा सोलापूर यांचे प्रकरणेकरीता स्वतंत्र पॅनेल निर्माण करण्यात आले.
पॅनल प्रमुख म्हणून श्रीमती डी.डी. कोळपकर यांनी काम पाहिले. सदर पॅनलवर 8 हजार 954 इतकी प्रकरणे तडजोडी करीता ठेवण्यात आली होती.
त्यापैकी 2 हजार 328 इतकी प्रकरणे निकाली काढण्यात आली त्यापोटी 21 लाख 8 हजार 610 इतकी रक्कम वसूल करण्यात आली. सदर पॅनलेचे कामकाज यशस्वी करण्याकरिता सहायक पोलीस आयुक्त श्री.खिराडकर,
सहायक अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री.राजन माने, पोलीस निरिक्ष श्री.तानाजी दराडे, पोलीस निरिक्षक श्री.उदय पाटील तसेच सर्व वाहतूक नियंत्रण शाखेतील सर्व अधिकारी,पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सदर लोक अदालतीमध्ये दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर येथील सर्व ग्रामपंचायतीचे कर वसूलीचे दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुलदीप जंगम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ईशाधीन शेळकंदे, उत्तर सोलापूरचे गट विकास अधिकारी श्रीमती जस्मिन शेख, दक्षिण
सोलापूरचे गट विकास अधिकारी व सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांच्या सहकार्याने 838 इतकी प्रकरणे निकाली काढण्यात आली असून 1 कोटी 19 लाख 84 हजार 251 इतकी रक्कम सदर लोकअदालतीमध्ये वसूल झाली आहेत.
बँक व वित्तीय संस्था, शहरातील विविध बँक अधिकारी व बँकेचे विधीज्ञ यांचे मोलाचे योगदान लाभले.
तसेच सदर लोक न्यायालयामध्ये शहर पोलीस व वाहतुक नियंत्रण शाखा यांनी चोख बंदोबस्त नेमूण गर्दीवर नियंत्रण करण्यास मदत केली. महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान यांनी सुध्दा सहकार्य केले.
सदर लोकन्यायालयाची मुद्देसुद माहिती खालील प्रमाणे- एकूण प्रलंबित ठेवलेली प्रकरणे 39 हजार 110 एकूण तडजोड झालेली प्रलंबित प्रकरणे 4 हजार 607 प्रलंबित प्रकरणातील तडजोड रक्कम 60,85,52,613,
तसेच दाखलपूर्ण प्रकरणे एकूण दाखलपूर्व प्रकरणे 51 हजार 435 एकूएा तडजोड झालेली दाखलपूर्व प्रकरणे 6 हजार 383 दाखलपूर्व प्रकरणातील तडजोड रक्क्कम 20,कोटी 85 लाख 52 हजार 613 ऑनलाईन व व्हॉटसअप च्या मदतीने तडजोड प्रकरणे 25 तेडजोड झालेली वैवाहिक प्रकरणे 34
तालुका विधी सेवा समितीचे प्रकरणे सोलापूर 5 हजार 918 एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम रक्कम रुपये 4702,94,139 अक्कलकोट 732 एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम 92 लाख 7 हजार 392
बार्शी 2 हजार 669 एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम 4 कोटी 97 लाख 54 हजार 220 माढा 276 एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम 5 कोटी 75 लाख 18 हजार 253 मोहोळ 73 एकूण प्रकरणातील तडजोड
रक्कम 2 कोटी 83 लाख 54 हजार 648 माळशिरस एकूण तडजोड झालेली प्रकरणे 333 एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम 5 कोटी 94 लाख 91 हजार 777, मंगळवेढा तडजोड प्रकरणे 251 एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम 1
कोटी 76 लाख 28 हजार 094, पंढरपूर तडजोड प्रकरणे 179 एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम 8 कोटी 21 लाख 89 हजार 911, करमाळा तडजोड प्रकरणे 160 एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम 2 कोटी 89 लाख 84 हजार 072,
सांगोला तडजोड प्रकरणे 400 एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम 71 लाख 58 हजार 954 एकूण 10 हजार 990 प्रकरणे एकूण प्रकरणातील तडजोड रक्कम 81 कोटी 5 लाख 81 हजार 360 असे अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांनी कळविले आहे.
0 Comments