google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला - चांडोलेवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुनश्च एकदा राजाराम मेटकरी तर उपाध्यक्षपदी कोमल चांडोले यांची निवड

Breaking News

सांगोला - चांडोलेवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुनश्च एकदा राजाराम मेटकरी तर उपाध्यक्षपदी कोमल चांडोले यांची निवड

सांगोला - चांडोलेवाडी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पुनश्च एकदा राजाराम मेटकरी तर उपाध्यक्षपदी कोमल चांडोले यांची निवड


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला दि.1:  शहरातील चांडोलेवाडी येथील जि.प.प्रा.शाळा चांडोलेवाडीच्या शाळा व्यवस्थापन समितीची काल निवड करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी कोमल विनायक चांडोले तर 

अध्यक्षपदी पुन्हा एकदा राजाराम बिरा मेटकरी यांची निवड करण्यात आली. ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले. 

काल सोमवार दि.30 सप्टेंबर 2024 रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठण करण्यासाठी शाळेच्या कार्यालयात सभा घेण्यात आली.त्यात अध्यक्ष,  उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्यांची निवड करण्यात आली. 

सदस्य म्हणून दत्तात्रेय मधुकर सावंत, धनाजी मारुती मेटकरी, भाऊसाहेब शिवाजी नांगरे, वर्षा अनिल बुरांडे, कोमल विनायक चांडोले रूपाली समाधान चांडोले, 

रेखा चांडोले, सपना पिंटू गुसाळे,विद्यार्थी विघ्नेश मोहन सरगर,विद्यार्थिनी समृद्धी गोरख सरगर व नंदा बाजीराव शिंदे शिक्षक प्रतिनिधी तर सचिव म्हणून मुख्याध्यापक अंकुश तुकाराम गडदे यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी माजी अध्यक्ष नंदूभाऊ बजरंग मेटकरी, उमेश नाना चांडोले, प्राध्यापक ज्योतिबा धोकटे,करण घाडगे, बंडू चव्हाण,मधुकर कपडेकर,पोपट सरगर,पुनम कोमल चांडोले, स्वाती चांडोले, 

रूपाली सुधीर चांडोले, ज्योती वायचळ, उमा मुळे, विमल चांडोले, रेखा चांडोले,शिक्षक प्रदीपकुमार पाटील,लक्ष्मी पाटील, अरुणा तेली आदी महिला, पालक, ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय नवले यांनी केले.

Post a Comment

0 Comments