google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..एखतपुर उड्डाणपूला खालील पाण्याचा निचरा तात्काळ करावा :-अशोक कामटे संघटना

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..एखतपुर उड्डाणपूला खालील पाण्याचा निचरा तात्काळ करावा :-अशोक कामटे संघटना

ब्रेकिंग न्यूज..एखतपुर उड्डाणपूला खालील पाण्याचा निचरा तात्काळ करावा :-अशोक कामटे संघटना


सांगोला (प्रतिनिधी) (शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)


सांगोला- एखतपुर मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग खालील पावसाचा पाण्याचा निचरा करावा अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग NHAI विभागाकडे शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने केली आहे. 


या एकतपुर मार्गावर NH 166 उड्डाणपूल जातो त्याखाली सर्विस रोड असल्याने दोन्ही बाजूने तीवर उतार असल्याने पावसाचे पाणी ब्रिज खाली कायमस्वरूपी साठून राहते

 या उड्डाण पुलाखाली गेल्या  चार महिन्यापासून वारंवार पाऊस झाला की  तीन ते चार फूट पाणी साचते. या मार्गावरून अनेक  शालेय विद्यार्थी, 

ज्येष्ठ नागरिक, महिला सायकल, दुचाकी, चार चाकीवरून प्रचंड वर्दळ असते त्यामुळे या साठणाऱ्या तळ्यात अनेक छोटे-मोठे अपघात दररोज घडत आहे. या राष्ट्रीय महामार्ग लगत जाणाऱ्या सर्विस रोड लगत

 कोणत्याही प्रकारची महामार्ग रस्ता तयार करतेवेळी या विभागाने ड्रेनेज बांधलेली नसल्याने ही समस्या उद्भवत आहे .सतत पाणी साठून तीस फुटाच्या रस्त्यामध्ये मोठ -मोठे खड्डे पडल्याने खड्डे चुकवताना अपघात घडत आहेत. 

तरी या प्रश्णी तात्काळ राष्ट्रीय महामार्ग विभाग, सोलापूर यांनी लक्ष देऊन ही समस्या दूर करावी अशी अनेक नागरिकांनी अशोक कामटे संघटनेकडे सूचना केलेली आहे. या सूचनेप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक यांना निवेदन पाठवले आहे. 

या समस्यांच्या निवेदनाची दखल घेऊन आवश्यक त्या उपयोजना करून हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचे शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीने माहिती देण्यात आली.

Post a Comment

0 Comments