google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर इतर क्षेत्रात करिअर करा... -अध्यक्ष अमरसिंह (बापूसाहेब) देशमुख

Breaking News

विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर इतर क्षेत्रात करिअर करा... -अध्यक्ष अमरसिंह (बापूसाहेब) देशमुख

विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर इतर क्षेत्रात करिअर करा... -अध्यक्ष अमरसिंह (बापूसाहेब) देशमुख 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)



सांगोला :- माझ्या शाळेत शिकणारा विद्यार्थी मोठा होतो याचा अभिमान तर आहेच परंतु तो मागे वळून शाळेकडे पाहतो

 याचा जास्त अभिमान व आनंद आहे. या शाळेत शिकणारा माजी विद्यार्थी विजय नानासाहेब शिंदे यांच्या वडिलांनी जमीन विकून शाळा शिकवली असे बाळू पंचाने सांगितले

 व आज ते पुण्यासारख्या ठिकाणी कंपनी काढून उद्योगपती झाले तर यासाठी मोठ्या घरात जन्माला यायचे असे नाही तर त्याचे शिक्षण व संस्कार महत्त्वाचे आहेत. व आज विजय शिंदे यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेऊन

 अभ्यासाबरोबर इतर क्षेत्रातील करिअर घडवावे असे मत आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमरसिंह बापूसाहेब देशमुख यांनी बलवडी हायस्कूल ता. सांगोला येथे संगणक कक्ष व सी.सी.टी. व्ही कक्षाचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष भाषणात मत व्यक्त केले. 

       शाळेचे मुख्याध्यापक संभाजी शिंदे व त्यांचा स्टाफ यांचे काम चांगले असून, शाळेसाठी बलवडी गावाचे योगदान मोठे असून त्यांचे व आमचे नाते आपलेपणाचे आहे. व स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी इंग्रजी ज्ञान घेणे गरजेचे आहे 

यासाठी प्रयत्न करा. व शाळेच्या अडीअडचणीसाठी कधीही एक फोन करा मदत करू तसेच शाळेचे उपक्रम चांगले असून विशेष म्हणजे शाळेत येताना आई-वडिलांच्या पाया पडून विद्यार्थी येतात व इतर उपक्रम ही चांगले

 त्यामुळे आम्ही दुसऱ्या शाळेत राबवू. आज विद्यार्थिनी चांगल्या बोलल्या परंतु विद्यार्थी बोलले नाहीत, यासाठी प्रयत्न करा व ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे 

असेही बापूसाहेब यांनी यावेळी सांगितले. सुरुवातीस प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी विजयकुमार शिंदे यांचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. 

       या शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक व सर्व स्टाफ चांगला आहे त्यास सर्वांनी प्रोत्साहन द्यावे कारण येथील उपक्रम चांगले व या शाळेमुळे मी घडलो परंतु विद्यार्थ्यांनी मोबाईलचा आवश्यक तेवढाच वापर करावा असे मत डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी व्यक्त केले. 

तसेच माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, मुख्याध्यापक एस. डी. शिंदे, विद्यार्थिनी वैष्णवी राऊत व श्रद्धा शिंदे यांनीही शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

 सदर प्रसंगी संस्थेचे निरीक्षक प्रकाश नामदास, सरपंच माऊली राऊत, मा. उपसरपंच समाधान शिंदे, एडवोकेट सत्यजित लिगाडे सरकार, 

पत्रकार रविराज शेटे, ग्रामपंचायत सदस्य विलास तात्या धायगुडे, शिवाजी शिंदे, बाबासाहेब पालसांडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ. मनीषा शिंदे, सदस्य नवनाथ पालसांडे, दिनकर सांगोलकर,

 रघुनाथ शिंदे, हनुमंत राऊत सर, पालक प्रतिनिधी सूर्यकांत शिंदे सर, संजय शिंदे, सचिन चव्हाण, उमाजी राऊत, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन एन. टी . करडे, तर आभार शिक्षक एस. व्ही . बदडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments