माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा एकच फोन प्रॉब्लेम सॉल्व...!
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला प्रतिनीधी / सांगोला तालुक्यातील वासुद रेल्वे स्टेशनवर ये-जा करणाऱ्या रस्त्याच्या कडेला काटेरी वृक्ष वाढले आहेत.
त्याचबरोबर या रेल्वे स्टेशनवर लाईटची सोय नाही.यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासी व विद्यार्थ्यांना याचा सतत त्रास होत आहे.
या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात व रेल्वे स्टेशन परिसर व रस्त्यावरील काटेरी वृक्ष काढून टाकावेत,अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात होती.सदर मागणी लक्षात घेऊन खासदार मा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी
सोलापूर विभागीय प्रबंधक यांना पत्र लिहून मुलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात म्हणून सुचना केल्यानंतर वासुद रेल्वे स्टेशनवर मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही सुरू झाली.
0 Comments