google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

Breaking News

माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन 



माणगंगा परिवारचे संस्थापक अध्यक्ष श्री.नितीन (आबासाहेब) विठ्ठल इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रविवार दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळावा

मुक्ताई रिसॉर्ट, खारवटवाडी, कडलास रोड, सांगोला येथे आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी विषय पशु आहार व गोठा व्यवस्थापन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून विस्तार शिक्षण महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे संचालक डॉ.अनिल भिकाने सर, डी.जी.एम जे.ए.जाफाफीड श्री.हेमंत घोडके व फीड क्वॉलिटी कन्ट्रोल हेड डॉ.मयुरी धुमाळ हे उपस्थित राहणार आहेत.

तरी रक्तदान शिबीर व शेतकरी मेळाव्यास सांगोला शहर व परिसरातील शेतकरी बांधवांसह, सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी, माणगंगा डेअरी इंडस्ट्रीज,

पालवी ऍग्रो केमिकल्स, दुध उत्पादक चेअरमन, संचालक, कर्मचारी वृंद यांच्यावतीने करण्यात आले आहे. वाढदिवसानिमित्त भेट वस्तु म्हणुन शैक्षणीक साहित्य द्यावे, जेणेकरुण गरजू विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करता येईल असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments