google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महिला वर्गासाठी आनंदाची बातमी " "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला मुदतवाढ"...!

Breaking News

महिला वर्गासाठी आनंदाची बातमी " "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला मुदतवाढ"...!

महिला


वर्गासाठी आनंदाची बातमी "  "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला मुदतवाढ"...! 

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली असून या संदर्भामध्ये राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली असून महाविकास आघाडीचे सर्व नेते या योजनेवरुन महायुती सरकार वर टीका करत असतात.

जर असे असले तरी महायुती सरकार लाडकी बहिण योजनेचे विविध कार्यक्रम राज्यभरात होताना पहावयास मिळत आहे.

राज्य शासनाने याबाबत मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.लाडकी बहिण योजनेला मुदतवाढ ही २१ ऑगस्ट २०२४ रोजी संपुष्टात आली होती.

अद्यापही लाडकी बहिण योजनेत ज्या महिलांनी योजनेत अर्ज केलेला नाही अश्या सर्व महिला भगिनींनी या योजनेला व मिळणाऱ्या निधीला मुकावे लागणार का ? असा प्रश्न महिलांना पडलेला होता.

      आता या सरकारने सर्व महिला भगिनींना लाडकी बहिण योजनेत मुदत आणखी एक महिन्याभरासाठी वाढवलेली आहे. 

त्यामुळे महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.अनेक महिलांना अद्याप या योजनेत अर्ज करता आला नाही. त्यामुळे अनेकांचे अर्ज रद्द झाले.

त्यामुळे या महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून लाडकी बहिण योजनेला ३० सप्टेंबर २०२४ पर्यन्त मुदतवाढ देण्यात आली. सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना तीन महिन्यांचे एकूण ४५०० रुपये मिळणार आहेत.

Post a Comment

0 Comments