google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील संतापजनक घटना! दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून महाविद्यालयात घुसून प्राध्यापकास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

Breaking News

सांगोला तालुक्यातील संतापजनक घटना! दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून महाविद्यालयात घुसून प्राध्यापकास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

सांगोला तालुक्यातील संतापजनक घटना! दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून महाविद्यालयात घुसून प्राध्यापकास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण


सांगोला :- कारचा पाठीमागून धक्का लागल्यानंतर जाब विचारल्याच्या कारणावरून चिडून शेकाप माजी नगरसेवकांच्या नातूसह पाच जणांनी मिळून कॉलेजमध्ये घुसून प्राध्यापकास बेदम मारहाण केली.

ही घटना शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास सांगोला शहरातील डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय येथील प्राचार्यांच्या केबिनसमोर घडली.

मारुती आनंदा हाके (५४ रा. शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळेजवळ, सांगोला असे जखमी प्राध्यापकाचे नाव आहे.

दरम्यान घडला प्रकार महाविद्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचे जुनोनी येथील प्रा.मारुती हाके हे सांगोल्यातील डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून नोकरीस आहेत.

प्रा.हाके हे शुक्रवारी सकाळी ८ वाजता सांगोला येथील घरातून दुचाकीवरून वासूद रोडनी कॉलेजवर निघाले होते. वाटेत पाठीमागून येणाऱ्या कारचा त्यांच्या दुचाकीला दोन वेळा धक्का लागल्याने त्यांनी

कार थांबून कारमधील तरुणास तुला नीट कार चालवता येत नाही म्हणून कारची चावी काढून घेऊन तुझ्या घरच्यांना बोलवून घे, असे म्हणून त्या तरुणास चापट मारली व ते कॉलेजवर निघून गेले.

तो तरुण नातेवाईकांना घेऊन कॉलेजवर आला. त्यावेळी महाविद्यालयाचे सचिव, प्राचार्य, प्रा. हाके व इतर प्राध्यापक मंडळींनी घडलेल्या प्रकाराबद्दल त्या तरुणाची माफीही मागितली होती.

दरम्यान दुपारी १२ च्या सुमारास प्रा. हाके हे प्राचार्य यांच्या केबिन समोर इतर शिक्षकांसमवेत बोलत थांबले असता त्या तरुणासह इतर चार जणांनी कॉलेजमध्ये घुसून हातातील दगड, बेल्टने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

प्राचार्याकडून पोलिसांना लेखी पत्र

महाविद्यालयाचे प्राचार्य सिकंदर मुलाणी यांनी घडल्या प्रकाराची दखल घेत सांगोला पोलीस स्टेशनला लेखी पत्र देऊन संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

पोलिसांनी प्रा.हाके यांचा जबाब घेतला असून, रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

Post a Comment

0 Comments