मोठी बातमी.. डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयास बी ++ मानांकनाचा दर्जा प्राप्त
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी):-डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयाला दि. 12 व 13 सप्टेंबर 2024 रोजी 'राष्ट्रीय मूल्यांकन समिती' बेंगलोर यांनी
मूल्यांकनासाठी दोन दिवसीय भेट दिली. या समितीचे चेअरमन पी. प्रकाश (दिल्ली), प्रा. डॉ. सुस्मितो प्रसाद पाणी, भुवनेश्वर (ओरिसा) व प्रा.डॉ. मिनाक्षी सुदरराजन (तामिळनाडू) यांनी
प्रत्यक्ष पाहणी करुन गुणात्मक व गुणात्मकतेच्या दृष्टीने माहिती घेतली. यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीकोनातून महाविद्यालयातील विविध विभागाअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले होते.
याची कमिटीकडून कसून तपासणी करुन महाविद्यालयाचा दर्जा ठरविण्यात आला. यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी बी++ असा मूल्यांकनाचा दर्जा देण्यात आला.
सदर दर्जा देत असताना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सुविधांचा ऊहापोह करण्यात आला व 'राष्ट्रीय मूल्यांकन समिती' बेंगलोर यांच्याकडून समाधान व्यक्त केले.
सदर मानांकन प्राप्त करण्यासाठी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला या संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. अनिकेत देशमुख, संस्था चिटणीस मा. विठ्ठलराव शिंदे सर, संस्था सदस्य पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी, अंतर्गत गुणवत्ता
हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ. शंकर धसाडे, महाविद्यालयातील शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास होण्यासाठी प्रयत्न केले.
डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाला सांगोला तालुक्यामध्ये उत्कृष्ट व उच्च प्रतीचा बी++ (सीजीपीए 2.94) दर्जा मिळवून दिलेबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. शंकर घसाडे,
सर्व शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिकेत देशमुख, संस्था चिटणीस विठ्ठलराव शिंदे सर, संस्था सदस्य सर्व पदाधिकारी यांनी कौतुक व अभिनंदन केले.
डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय डॉ. गणपतराव देशमुख यांनी दीनदलित, गोरगरिब, आर्थिकदृष्टया मागास, शेतकरी, कष्टकरी, मजूर, भूमिहिन, विद्यार्थी जे शिक्षणापासून वंचित राहतात त्यांच्यासाठी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ,
सांगोला ची स्थापना 1969 रोजी केली होती आणि महाविद्यालयाची स्थापना 23 सप्टेंबर 1991 रोजी करण्यात आली. त्यांची ध्येयपूर्ती ही महाविद्यालयाला मिळालेल्या उत्कृष्ट दर्जा मानांकनावरुन झाल्याचे स्पष्ट होते.
त्यामुळे सांगोला तालुका आणि परिसरामधील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, माहिती व तंत्रज्ञानाचे शिक्षण डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामधून मिळणे सोयीचे झाले आहे.
0 Comments