google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्रातील पहिला तृतीयपंथी उपसरपंच पदी दिलीप हेगडे यांची निवड

Breaking News

महाराष्ट्रातील पहिला तृतीयपंथी उपसरपंच पदी दिलीप हेगडे यांची निवड

 महाराष्ट्रातील पहिला तृतीयपंथी उपसरपंच पदी दिलीप हेगडे यांची निवड


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

आटपाडी  प्रतिनिधी समाधान जावीर आवळाई ता. आटपाडी येथील पहिल्यांदाच तृतीयपंथी दिलीप हेगडे यांना उपसरपंच पदाचा सन्मान मिळाला आहे.

 तृतीयपंथी समाजातील वर्गाला मान सन्मान मिळत नाही त्यांच्याशी भेदभाव केला जातो.

 पण आवळाई ग्रामस्थांनी समाजाचे मुख्य प्रवास आणण्याचे काम केले आहे .दिलीप हेगडे यांचे निवड झाल्याबद्दल 

आटपाडी येथील आवळाई ग्रामपंचायत येथे जाहीर सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी माननीय बहुजन समाज पार्टीचे 

खानापूर -आटपाडी विधानसभा अध्यक्ष संतोष हेगडे यांनी आवळाई गावातील सर्व ग्रामस्थांचे तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचे जाहीर आभार मानले

 तसेच शिवस्वराज्य महाराष्ट्र राज्य संघटन प्रदेश अध्यक्ष मोहन (भाऊ )बागल 

ग्रामपंचायत सदस्य काळेवाडी ,यांनी सुद्धा या ठिकाणी दिलीप अण्णा हेगडे यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच फुले . शाहु.आंबेडकर. चळवळीचे कार्यकर्ते आबासाहेब गुळीग,तसेच

 रोहित चंदनशिवे, समाधान जावीर, विकास साळुंखे ,गोविंद हेगडे,समाधान वाघमारे,भगवान ,साळुंखे ,दादा साळुंखे, आदी मान्यवर उपस्थित होते तसेच या सर्वांना भरभरून दिलीप( अण्णा )हेगडे, यांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments