खळबळजनक..रात्री अपरात्री फिरणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, पोलिसांनी केला उलगडा.. कोण आणि कशासाठी करतंय सर्वेक्षण ?
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
गेल्या महिन्याभरापासून गावागावात रात्रीच्या वेळेला दिसणाऱ्या ड्रोनच्या दहशतीमुळे ग्रामीण भागात मोठी चर्चा होती. शेतशिवारात घराच्या छतावर रात्री अपरात्री ड्रोनच्या गिरट्या वाढल्याने नागरिक हैराण झाले होते.
पण आता या ड्रोनच्या फेऱ्यांचा उलगडा झालाय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर तालुक्यात उडणारे ड्रोन सर्वे करण्यासाठी उडवल्याचं समोर आलंय.
दिल्लीतील एका खाजगी कंपनीकडून ड्रोन द्वारे सर्वे करण्यात येतोय. यासाठी पोलिसांनी लेखी परवानगीही दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आता ड्रोन दिसला तर घाबरू नका असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.
गेला काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये रात्री अपरात्री ड्रोनच्या गिरटा वाढल्या होत्या.
घरावर शेतावर अचानक एखादा ड्रोन येऊन निघून जायचा. हा ड्रोन नक्की कोण उडवताय किंवा कुठून आला आणि कशासाठी आला हे माहीत नसल्याने नागरिक धास्तावले होते.
गावात चोऱ्याही वाढल्याने चोरीसाठीच या ड्रोन चा वापर होतोय अशी शंका बळवली होती. पण आता रात्री अपरात्री उडणाऱ्या या ड्रोन नाट्यावर पोलिसांनीच पडदा टाकला आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड पैठण सिल्लोड वैजापूर या तालुक्यांमध्ये काही ठराविक गावांमध्ये द्रोनद्वारे शेती सर्वेक्षण करण्याकरता
फोटो व शॉर्ट व्हिडिओ चित्रीकरण होणार होते. यासाठी पोलीस विभागाकडून दिल्लीतील खाजगी कंपनीला परवानगीही देण्यात आली होती.
या परवानगी पत्रानुसार काही अनुचित घटना किंवा प्रकार घडल्यास त्याचे गंभीर पडसाद उमटू शकतात त्यामुळे हे चित्रे करण करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही
याची दक्षता घ्यावी असेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या गावांमध्ये सर्वेक्षण करण्याकरता ड्रोन उडत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन
आता रात्री अपरात्री ड्रोन दिसल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये असा आवाहन पोलिसांनी नागरिकांना केला आहे. शेतीच्या सर्वेक्षणासाठी एका दिल्लीतील कंपनीला पोलिसांनी
या सर्वेक्षणाची चित्रफीत बनवण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे चोर किंवा दरोडेखोर यांचा या ड्रोनशी काहीही संबंध नसल्याचं उघड झालं आहे.
रात्री आठ ते दहा च्या दरम्यान अनेक जण आमच्या गावात ड्रोन दिसल्याची तक्रार करतात. पण हे ड्रोन सर्वेक्षणासाठी फिरत असून निरूपद्रवी असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
रात्रीच का उडत होते ड्रोन?
या कंपनीला दिलेल्या परवानगीनुसार सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत त्यांना ड्रोन उडवण्याची परवानगी होती. पण काही लांब पल्ला असणाऱ्या गावात ड्रोन पोचण्यास उशीर होत
असेल तिथे रात्रीही ड्रोन उडवले जात होते. असं पोलिसांनी सांगितले. या संपूर्ण विषयाची पडताळणी सध्या पोलिसांकडून सुरू असून अँटिड्रोजन चाचण्या हे करणार असल्याचं सांगण्यात आलंय.
कोण आणि कशासाठी करतंय सर्वेक्षण ?
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार सप्तर्षी सर्विसेस नावाच्या दिल्लीच्या कंपनीचे हे ड्रोन आहेत . या कंपनीने ड्रोन उडवण्याची परवानगी घेतली आहे . हा सर्वे केंद्र शासनाच्या प्रोजेक्ट चा भाग असल्याचं ही प्रशासनाने सांगितलं आहे.
0 Comments